Animal Market : पलूसमधील जनावरांच्या बाजारात आवक, विक्रीत वाढ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वत्र जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले होते. पलूसच्या बाजारात होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
Animal Market
Animal Market Agrowon

Sangli Animal News : पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Paloos Agricultural Produce Market Committee) बाजारात कोरोनानंतर जनावरांची आवक व विक्री वाढत आहे. बाजार पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. ठप्प झालेली उलाढाल हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

अनेक वर्षांपासून येथे जनावरांचा बाजार भरतो. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसह महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. आठवड्यातून एकदा मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो.

गाय, म्हैस, शेळी, बोकड, मेंढी, बैल, कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक व विक्री होते. वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल येथील कृषी उत्पन्न बाजार (Bajar Samiti) समितीत होते.

Animal Market
Lumpy skin : वडगाव जनावरे बाजार बंद असल्याने नुकसान

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वत्र जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले होते. पलूसच्या बाजारात होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. दोन वर्षे बाजारात शुकशुकाट होता. व्यापारी, मध्यस्थ अडचणीत आले.

शेतकऱ्यांचीही बाजार बंद असल्याने अडचण निर्माण झाली. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर जनावरांचा बाजार पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लम्पी स्कीनमुळे बैल, गायींची आवक नसली तरी अन्य जनावरांच्या आवकेत व विक्रीत वाढ झाली आहे.

विक्रीत चांगली वाढ

२०२०-२१ या वर्षात पलूस बाजारात गाई, म्हशींची आवक ६०० तर विक्री ४६० होती. शेळी, बोकड, मेंढी यांची एकूण आवक ३ हजारांपर्यंत होती, तर विक्री १ हजार ५०० पर्यंत होती. २०२१-२२ या वर्षी बाजारातील आवकेत व विक्रीमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली.

गाय व म्हैस यांची आवक २ हजार ५०० पर्यंत आहे, तर विक्री १ हजारांपर्यंत आहे. शेळी, मेंढी व बोकड यांची आवक ७ हजार ३०० झाली आहे, तर विक्री ८०० पर्यंत झाली. डिसेंबर २०२२ अखेर आकडेवारीतही जनावरांच्या आवकेत व विक्रीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षे बाजारात उलाढाल ठप्प होतीच; मात्र, गेल्या वर्षीपासून जनावरांचा बाजार पूर्वपदावर येत आहे. म्हैस, शेळी, बोकड यांची आवक व विक्री बऱ्यापैकी होत आहे.
शहाजी धुमके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com