इर्षाद बागवान यांची अनमोल हॅंसी कथा वाचली का?

सईदने स्कूटर स्टण्डवरून काढली. आपल्या बाजूला वाकवली आणि किक् मारली. गाडीवर बसला. गियर टाकतोयच तशी ॲक्सलेटर पिळण्याअगोदरच गाडी पुढे निघाल्यासारखी होत बंद झाली.
Anmol Hasse
Anmol HasseAgrowon

लेखक -इर्षाद बागवान

सईदने स्कूटर स्टण्डवरून काढली. आपल्या बाजूला वाकवली आणि किक् मारली. गाडीवर बसला. गियर टाकतोयच तशी ॲक्सलेटर पिळण्याअगोदरच गाडी पुढे निघाल्यासारखी होत बंद झाली. ‘च् च् च् च् , आच्चीच तकलीफ दी गे माँ तुने. आक्शी जानच निकाली देक…,’ सईद मनातल्या मनात चरफडला.

झालं होतं असं की सईदची स्कूटर अलीकडे नीट चालेनाशी झाली होती. खरं तर काळ बदलला होता आणि स्कूटरचा जमाना भूतकाळात जमा झाला होता. आता तर निरनिराळ्या बाइक्स, मोपेड ही गेल्या दोन दशकांत रुळलेल्या दुचाकी वाहनांची सद्दीही विरळ होत चालली होती. पेट्रोलचे दर भयंकर वाढलेले, ट्राफिक अनावर वाढलेले आणि या अनुषंगाने प्रदूषणही वाढलेले, यामुळे मार्केटमध्ये हिरव्या नंबरप्लेटधारी इलेक्ट्रिक बाइक्स, मोपेड दिसू लागल्या होत्या. एकदा घ्या, चार्ज करा आणि चालवा अशी झोकात ॲड चालू होती.

एकविसाव्या शतकातील मार्केटही इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल होऊ लागले होते आणि सईद अजून आपल्या अठराशे छप्पन मॉडेल स्कूटरसह विसाव्या शतकातच होता. अठराशे छप्पन मॉडेल हा त्याच्या बायकोच्या म्हणजेच नजमाच्या तोंडातला शब्दप्रयोग. नजमाच्या मते त्या स्कूटरची योग्य जागा म्हणजे भंगाराचे दुकान ही होती, परंतु सईद काही तिला अजिबात सोडायला तयार नव्हता.

आताही जेव्हा गाडी चालू होऊन बंद पडली, नजमाला चाहूल लागलीच. ती घरातून बाहेर येत म्हणाली, “पड्या ना बंद वू डबडा ! अजी आबी एकच बुल्तीव तुम्नां, एक तो मजे नांदाव नैतो इशे. फैसला करो. कौतक यो जनाजा़ ले के फिरनाले खंदेपर? नवी गाडी लेव आबीतुबी. तुमारेबी हड्ड्या न् हड्ड्या खिळखिळे करी यो सौतनने. ह्याशे निकालके शिद्दा भंगारका दुकान दिखाव इशे. फिरतुबी नवा कुच्तुबी आइंगा यो घरमें.”

Anmol Hasse
Crop Loan : भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

सईदला ही बडबड एव्हाना अंगवळणी पडली होती. त्याने नेहमीसारखी मुंडी हलवली आणि पुन्हा किक् मारली. या वेळी मात्र गियर टाकताना त्याने डाव्या पायाने जमीन रेटून गाडीला जरा स्पीड दिला आणि क्लच हळूवार सोडत हलकाच ॲक्सेलेटर दिला ज्यामुळे गाडीला मौसम मिळाला. गाडी रस्त्याला लागली.

‘आजतुबी गॕरेजकू लिजानेच हुना इशे. केत्ते दिन ऐसाच ढकलनेका. आपला ठीक हय, पन बच्चान्का… बच्चेकच्चे आस्ते गाडीपर. चिपीच् कुच्तुबी लडतर नको पिच्चे’, सईदने विचार केला. आतापर्यंत ढकलगाडी चाललेलीच होती परंतु गेले दोन दिवस मुलांना शाळेत सोडताना कहर ट्र

Anmol Hasse
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

फीकमुळे खूप त्रास झाला होता. दोनदा तर धडकता धडकता वाचला होता तो. ब्रेक लायनर गेलेले आहेत हे सलाम मिस्त्रीकरवी समजून वर्षापेक्षा अधिक काळ झाला होता. तरीही आताआतापर्यंत ब्रेक कमी का होईना लागत तर होता, परंतु गेले दोन दिवस शब्दशः पॕडलवर उभे राहूनही गाडी थांबायला मागत नव्हती. स्पीड कमी होत होतं परंतु ट्रॕफीकमध्ये अचानक निकडीची वेळ खूपदा येते तेव्हा कच्चकन् ब्रेक दाबून गाडी उभी करायची म्हणजे सईदची भलतीच कसरत होऊ लागली होती. त्यांत क्लचचंही कायतरी बिनसलं होतं. क्लच पूर्ण धरुनही गाडी रेसमध्ये असल्यासारखी घोडा उधळल्यागत उधळत होती. परंतु म्हणतात ना सगळं शेवटी खिशावर येऊन थांबतं.

सईदचं गल्लीतच कटलरीचं छोटंसं दुकान होतं. त्यातून त्याचं घर चालायचं. लॉकडाउनमध्ये चांगले पैसे कमावले त्याने. रस्त्यावरची दुकानं बंद असल्याने बोळातलं सईदचं दुकान जोरात होतं. परंतु पैसा थोडीच थांबतो. त्यांत आता मार्केट ओपन झाल्याने गल्लीबोळातल्या दुकानांना मरणकळा आली. छोट्या छोट्या रोजच्या गरजेच्या वस्तू विकणारी दुकानं ओस पडू लागली. रुपया, दोन रुपयांनी कमावणारी आणि खाणारी ही दुकानदार माणसं गिऱ्हाईक नसल्यामुळे हतबल होऊ लागली. माल भरायला भांडवल नाही, त्यातही कर्ज काढून माल भरला तर समोरून गिऱ्हाईक नाही. त्यांत मार्जिन रेशो कमी.

महागाई तर निरंतर वाढत चाललेली. त्यांत जीएस्टीचे नवीन नियम लागू करून मायबाप सरकारने जणू छोट्या व्यापाऱ्यांचे पायच कापून टाकले होते अशी परिस्थिती. तेव्हा जगायचं कसं हा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सईदची अवस्थाही याहून वेगळी नव्हती. उलट काकणभर जास्त वाईट होती असं म्हणावं लागेल. कारण वीसेक वर्षं तो हेच कटलरीचं दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पाहात होता. आता वयाची गाडीही उताराला लागलेली. नवीन काही सुचेना, जमेना.

त्यांत कुटुंबकलहामुळे अलीकडे त्याला वडिलोपार्जित घरही सोडावं लागून भाड्याने रूम घ्यावी लागली होती. कोरोनानंतर लोकांनी घरोघरी दुकानं थाटली. त्यामुळे धंद्यात कॉम्पिटिशन वाढलेलं. त्यांत भांडवल कमी असल्याने मालाची कमतरता. अशा एकूण गोचीमुळे सईदही त्रस्त होता. परंतु एकूणच सईदचा स्वभाव पोटापुरता विचार करून शांत राहणं पसंद करणारा होता आणि हेच नजमाला खुपायचं.

तिच्या मते सईदला स्वप्नंच नाहीत तर पैसा कुठून यावा. त्यांत मुलं मोठी होऊ लागली होती. त्यांचे खर्चही वाढू लागलेले. या कारणाने नजमा काहीबाही शिवणकाम, स्वयंपाक वगैरे करून पैशाला पैसा जोडत घरखर्चाला हातभार लावत निगुतीने संसार करत होती. आता सईदचं दुकान डबघाईला आल्यावर तिच्या याच काटकसरी आणि धडपड्या स्वभावामुळे त्यांच्या संसाराचा गाडा टिकीटिकी का होईना पुढे चालला होता.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com