Onion Subsidy : सांगली जिल्ह्यातील ३९५० शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

Onion Bajarbhav : कांद्याला दर नसल्याने अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळावे यासाठी सांगली बाजार समितीकडे तीन हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon

Sangli Onion Rate : कांद्याला दर नसल्याने अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळावे यासाठी सांगली बाजार समितीकडे तीन हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जानेवारी ते मार्च या कालावधीत कांद्याला दर नसल्याने शासन प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देणार आहे. एका शेतकऱ्याला २०० क्विंटलच्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त ७० हजार रुपये अनुदान दिले जाईल. या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी बाजार समिती, खासगी बाजार समिती, नाफेड खरेदी केंद्र आदी ठिकाणांची कांदा विक्री ग्राह्य धरण्यात येत आहेत.

Onion Subsidy
Onion Subsidy : पाऊण लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

सांगली बाजार समितीत प्रामुख्याने नगर, पुणे, सोलापूर, सातारा, धाराशिव, नाशिक या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. सांगली बाजार समितीकडे ३ हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे केवळ दोन टक्केच अर्ज आहेत.

कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन भरण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांत ऑनलाइन माहिती भरून झाल्यानंतर शासनाकडे हा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाने सादर केला जाईल.
महेश चव्हाण, सचिव, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com