चांगल्या गोष्टींना दाद द्या

परवा पुस्तक प्रकाशनाच्या गडबडीत बायको समोरून येताना दिसली. तिला उमद्या मित्रासारखं हातात हात घेऊन म्हटलं छान दिसतेस. तिच्यासह अवतीभोवती काही मित्र होते तेही या क्षणिक, अनपेक्षित गोष्टीने खुश झाले. स्तुती कुणाला आवडत नाही! असे कित्येकदा आपण लोकांचे उत्स्फूर्त कौतुक करून आनंदाची पेरणी करू शकतो.
Good Things
Good ThingsAgrowon

परवा पुस्तक प्रकाशनाच्या गडबडीत बायको समोरून येताना दिसली. तिला उमद्या मित्रासारखं हातात हात घेऊन म्हटलं छान दिसतेस. तिच्यासह अवतीभोवती काही मित्र होते तेही या क्षणिक, अनपेक्षित गोष्टीने खुश झाले. स्तुती कुणाला आवडत नाही! असे कित्येकदा आपण लोकांचे उत्स्फूर्त कौतुक करून आनंदाची पेरणी करू शकतो. त्यामुळे आपली आणि समोरच्याची ती वेळ सुंदर होते.

समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास वाढतो. पण यासाठी आपल्याकडे आधी तो उमदेपणा असावा लागतो. दाद देणं म्हणजे प्रतिसाद देणं. त्यासाठी जगण्यातच एक जिवंतपणा असावा लागतो. याचा अर्थ कुणाची खोटी स्तुती करा, असे खचितच नाही. पण अनेकदा काही गोष्टींची पोहोचपावती देण्यात आपण कंजुषी करतो.

Good Things
Agricultural Electricity : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करा

कौतुकही मनापासून करावं, ती केवळ औपचारिकता ठरू नये. नुसतेच पान खाऊन किंवा कानात अत्तराचा बोळा ठेवून आपण रसिक होत नसतो. त्यासाठी छोट्याछोट्या गोष्टीतल्या सुंदरतेची, त्यातील काव्य-शास्त्र-विनोदाची जाण आणि भान आपल्याला असलं पाहिजे. आपल्यातल्या आस्वादक रसिकतेची व गुणग्राहकतेची ही एक कसोटीच आहे.

Good Things
Sustainable Agriculture : शाश्वत शेतीसाठी हवा ‘एकात्मिक’ दृष्टिकोन

एखाद्या हॉटेलातल्या एका दुर्लक्षित कोपऱ्यात चुलीवर भाकऱ्या करणाऱ्या बाईचं तुम्ही अनपेक्षित कौतुक करून पाहा. तिच्या दैनंदिन कष्टाच्या जीवनात तुमच्या कौतुकाने एक क्षण का होईना तिला आनंद मिळतो. तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्याच्या चांगल्या कृतीचे, चांगल्या गुणांचे कौतुक करा. विद्यार्थी असाल तरी तुम्हाला जेव्हा एखाद्या शिक्षकाचे शिकवणे आवडेल, तेव्हा ते तुमच्या शिक्षकांना सांगण्यास संकोच करू नका.

एखाद्या वक्त्याने एखादा छान मांडलेला मुद्दा, एखाद्या शायराचा एखादा काळजाचा ठोका चुकवणारा शेर असो, तुमची एक छोटीशी दाद कुणाची प्रेरणा ठरू शकते. घरी दारी कुठेही असे कौतुकाचे असंख्य क्षण आपल्या दादेच्या प्रतीक्षेत असतात. अनेकदा आपल्या संकोचाने ते उपेक्षित राहतात. एखाद्याचे बोलणे, एखाद्याचे रूप, एखाद्याची कृती, काहीही तुम्हाला छान वाटू शकतं.

तुम्ही ते तितक्याच निर्भेळपणे समोरच्या पर्यंत पोहोचवलंत, तर तुम्हाला तुमचाही दिवस सुंदर झाल्याची खात्री पटेल. तसेही दाद किंवा कौतुक ही ठरवून करण्याची गोष्ट नाही. ती आपसूक व मनातून आलेली पाहिजे. तरच ती तुम्ही अकारण देऊ शकता. एखाद्या चांगल्या गोष्टीला दाद देण्यामुळे वातावरणात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपण प्रवाहित करत असतो. त्यामुळे आपल्यात आणि समोरच्यातही त्या ऊर्जेचे तरंग उठतात. दाद हा असा रंग आहे, की जो दुसऱ्यांवर उधळल्यावर तो आपल्यावरही उडावा आणि आपणही त्यात माखून जावं, अशी ती प्रत्ययाची गोष्ट आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com