Parbhani Soybean variety: सोयाबीन, तूर आणि करडईच्या नवीन वाणांना मान्यता

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तूर, सोयाबीन आणि करडई पिकाचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत.
Parbhani Soybean variety
Parbhani Soybean varietyAgrowon

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तूर (Tur), सोयाबीन (Soybean) आणि करडई (Safflower) पिकाचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत. त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेने ( आयसीएआर- ICAR) नुकतीच मान्यता दिली. नवी दिल्ली येथे परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिची बैठक २६ ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यावेळी तुरीच्या बीडीएन-२०१३-२ (रेणुका)  तर सोयाबीनच्या एमएयुएस-७२५ आणि करडईच्या पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांना मान्यता देण्यात आली. 

Parbhani Soybean variety
Cotton नवीन वाणास ICAR ची मान्यता| ॲग्रोवन

तुरीच्या रेणुका वाणास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये लागवडीकरिता प्रसारण करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर सोयाबीनच्या एमएयुएस-७२५ आणि करडईच्या परभणी सुवर्णा या वाणांची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

 त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून वाण मान्यतेचे पत्र विद्यापीठाला नुकतेच प्राप्त झाले आहे. 

`` केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून वाण मान्यतेचे पत्र विद्यापीठाला नुकतेच प्राप्त झाले आहे.  त्यामुळे या वाणांचे बियाणे  बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार आहे. त्यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल,`` असे विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले. 

Parbhani Soybean variety
जॉइंट ॲग्रेस्कोत १४ वाणांना मान्यता

तीन वाणांची वैशिष्ट्ये कोणती?

तुरीचा बीडीएन-२०१३-२ (रेणुका) वाण 

बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्राने हे वाण विकसित केले आहे. हे वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या मध्य भारत प्रभागासाठी प्रसारित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.  बीएसएमआर-७३६ हे मादी वाण आणि आयसीपी-११४८८ हे आफ्रिकन दाते वाण यांचा संकर करून निवड पध्दतीने नवीन वाण विकसित करण्यात आले. हे नवीन वाण १६५ ते १७० दिवसात तयार होते. ते मर रोग आणि  वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाचे १०० दाण्याचे वजन ११.७० ग्रॅम आहे. दाणे लाल रंगाचे आहेत. या वाणाची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी १८ ते २० क्विटल आहे.

सोयाबीनचे एमएयुएस-७२५ वाण 

अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पाव्दारे विकसित केलेले हे वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहे. हे वाण लवकर म्हणजे ९० ते ९५ दिवसांत तयार होते. शेंगा जास्त प्रमाणात येतात. २०-२५ टक्के चार दाण्यांच्या शेंगा असलेले हे वाण आहे. बियाण्यांचा आकार मध्यम असून १०० दाण्यांचे वजन १० ते १३ ग्रॅम आहे. हे वाण कीड व रोगास मध्यम प्रतिकारक.  हेक्टरी उत्पादन क्षमता सरासरी २५ ते ३१.५० क्विंटल आहे.

करडईचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) वाण 

अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पाव्दारे विकसित केलेले हे वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहे. हे वाण कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी उपयुक्त आहे. तेलाचे प्रमाण अधिक म्हणजेच ३०.९० टक्के आहे. मर आणि अल्टरनेरिया रोग आणि मावा किडीस हे वाण सहनशील आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादन क्षमता कोरडवाहुमध्ये १० ते १२ क्विंटल तर बागायतीमध्ये १५ ते १७ क्विंटल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com