Horticultural Agriculture : जुन्नरमधील मायलेकींच्या श्रमातून जिरायती शेती झाली बागायती

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत खोडद (ता. जुन्नर,जि. पुणे) येथील मायलेकींनी चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अपार कष्ट करून जिरायती शेती बागायती केली.एक एकर पेरूची बाग फुलवली आहे. अपार कष्ट करत अडीच एकर शेती स्वकष्टातून फुलविली आहे.
Horticultural Agriculture
Horticultural AgricultureAgrowon

खोडद (ता. जुन्नर जि.पुणे) येथील शिवारात जयश्री पंढरीनाथ भोसले (वय ५५ वर्षे) आणि पार्वताबाई बन्सीलाल घंगाळे (वय ७५ वर्षे) या मायलेकी वास्तव्यास आहेत. त्यांची अडीच एकर बागायती शेती आहे. जयश्री भोसले यांचा मुलगा जयविजय हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने शेतीची सर्व जबाबदारी या मायलेकींवर आहे.

जयश्री भोसले यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. लग्नानंतर पुन्हा दोन वर्षानंतर त्या आई-वडिलांकडे राहायला आल्या. त्यावेळी घरच्या जिरायती शेतीत विविध प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीच्या काळात त्यांनी कॅनॉलच्या पाण्यावर झेंडू, मधू मका, पपई अशी विविध पिके घेतली. काही वेळा पीक उत्पादनात अपयशही आले. पाणी टंचाईने पीक जळाले,मात्र, खचून न जाता पुन्हा नवीन जोमाने त्या शेती मशागतीत व्यस्त राहिल्या.

लागवड क्षेत्र कमी असल्याने भोसले यांनी हंगामी पिके तसेच फळबागेचे नियोजन करून बहुपीक लागवडीवर भर दिला आहे. शेतीच्या कामात त्यांना आई पार्वताबाई यांची खंबीर साथ आहे.

Horticultural Agriculture
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायती

खडकाळ रानात पेरू लागवड

खडकाळ, हलकी जमीन असल्याने जयश्री भोसले यांनी २०१९ मध्ये बाजारपेठ आणि परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चाकरून एक एकरावर पेरूच्या तैवान पिंक जातीची लागवड केली. शाश्वत पाण्यासाठी शेतात एक कूपनलिका खोदली.

पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन आणि आच्छादनाचा वापर केला. पहिल्यावर्षी भीषण पाणी टंचाईच्या काळात कळशीने पाणी घालून पेरूची रोपे जगवली. परीसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत गेल्या तीन वर्षात त्यांनी पेरू बागेचे चांगले व्यवस्थापन ठेवले.

पीक व्यवस्थापनात त्यांना कृषी विभागातील अधिकाऱ्यांची चांगली मदत झाली.जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खते, जीवामृत, कंपोस्ट खताच्या वापरावर भर दिला. सेंद्रिय कीडनाशकांची फवारणी केली जाते. योग्य व्यवस्थापनातून आता फळाचे दर्जेदार उत्पादन मिळत आहे.

प्रतवारीतून उत्पन्न वाढ

- लहान, मध्यम आणि मोठा आकार आणि अति पिकलेले पेरू अशी प्रतवारी. त्यामुळे दराचा फायदा.

- मध्यम ते मोठ्या आकाराच्या पेरूला चांगली मागणी. पिकलेल्या पेरूची ग्राहकांना थेट विक्री.

- किरकोळ विक्रेते, स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री. प्रतवारीनुसार प्रति किलोस पन्नास ते साठ रुपये दर.

- खर्च वजा जाता वर्षाला तीन लाखांची उलाढाल.

Horticultural Agriculture
Organic Farming : राहुल रसाळ यांना ‘रोमीफ’चा ‘सेंद्रिय शेती’पुरस्कार’

संघर्षातूनच फुलली शेती...

शेती विकासातील संघर्षाबाबत जयश्री भोसले म्हणाल्या की, शेती करताना पाण्याची मोठी समस्या होती. काही वेळा प्यायला देखील पाणी मिळायचे नाही. पण जिरायती शेती बागायती करायची हे स्वप्न होते.

सुरवातीला नदीवरून पाणी आणण्यासाठी भागीदारीकरत सोसायटीकडून कर्ज काढून पाइप लाईन केली. शेतीला पूरक उद्योग म्हणून दोन गाई आणि कोंबड्या घेतल्या.

यातून कुटुंबाचा गाडा चालवला. पाइपलाइनसाठी घेतलेले कर्ज फेडण्यात सहा वर्षे गेली. मुलगा जयविजय शिक्षणानंतर सीआयएसएफ मध्ये नोकरीला लागला. त्यामुळे घरखर्चासाठी आर्थिक मदत होऊ लागली.

कूपनलिका घेऊन मिरची, टोमॅटो लागवडीस सुरवात केली. या पिकातून हातात दोन पैसे अधिकचे येऊ लागल्याने टप्याटप्याने शेतीमध्ये सुधारणा सुरू झाली. तीन वर्षापूर्वी पेरूची बाग केली. त्यातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला.

आज मला परिसरातील महिलांच्या शेतीशाळांमध्ये अनुभव सांगण्यासाठी बोलावले जाते. या कष्टमय जीवनात आईची फार मदत झाली. आज जी पेरूची बाग उभी आहे ती आईच्या कष्टावरच.

आईने डोक्यावरून पाणी आणून ही बाग जगविली आहे. पेरू काढणी, प्रतवारी तसेच घरगुती कामांमध्ये आईची मोठी मदत होते,त्यामुळे पीक व्यवस्थापनात मला लक्ष देणे सोपे जात आहे.

संपर्क - जयश्री भोसले, ८७८८३०५४६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com