मॉन्सूनच्या हुलकावणीमुळे खरीपाच्या पेरण्या रेंगाळल्या

देशाच्या ८४ टक्के भूभागात अद्यापही मान्सूनची हजेरी लागली नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. असे असले तरीही येत्या काही आठवड्यांत होऊ घातलेल्या पावसांनंतर उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये पेरणीच्या कामात गती दिसून येण्याची शक्यता आहे.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

देशातील बहुतांशी भागात अद्याप मॉन्सूनची (Monsoon) हजेरी लागली नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आतापर्यतच्या सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत घट दिसून आली असून पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या नजरा येत्या काळातील पावसाकडे लागलेल्या आहेत. आतापर्यंतच्या लागवडीत कडधान्याखालील क्षेत्र घटले असून शेतकऱ्यांनी तेलबिया, तृणधान्यास पसंती दिल्याचे दिसून आले.

देशाच्या ८४ टक्के भूभागात अद्यापही मान्सूनची हजेरी लागली नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. असे असले तरीही येत्या काही आठवड्यांत होऊ घातलेल्या पावसांनंतर उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडसारख्या प्रमुख कृषी उत्पादक राज्यांमध्ये पेरणीच्या कामात गती दिसून येण्याची शक्यता आहे.

Kharip Sowing
केंद्राकडून पुढच्या हंगामापर्यंत निर्यात मर्यादेचा पुनर्विचार नाही

१७ जुनपर्यंतच्या आकडेवारीनुसार खरीप पिकांचे लागवड क्षेत्र ८ टक्क्यांनी घटले. १७ जूनपर्यंत देशभरात ९९.६३ लाख हेक्टर क्षेत्रात खरीपातील पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच काळात १०८.२९ लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. यंदा शेतकऱ्यांनी सरासरी ४७.५३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात उसाची लागवड केली. उसाचा अपवाद वगळता अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याची नोंद आहे.

खरीपातील मुख्य पीक असलेल्या भात (Paddy) लागवडीखालील क्षेत्रात ३०.३ टक्क्यांनी घट झाली असून ८.७३ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आलीय. भातपिक उत्पादनात पश्चिम बंगाल खालोखाल नंबर असलेल्या उत्तर प्रदेशात ४४ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार कडधान्य लागवड क्षेत्रात ७.४ टक्क्यांची घट (४.३९ लाख हेक्टर) दिसून आली तर तेलबिया (Oil Seed) लागवड क्षेत्रात १७.९ टक्क्यांनी घट (४.७५ लाख हेक्टर) झाली. तृणधान्य लागवड क्षेत्र ३० टक्क्यांनी वाढून ६.८१ लाख हेक्टरवर गेले. कापूस लागवड क्षेत्र ६ टक्क्यांनी घटून १९.०६ लाख हेक्टरवर आलेय. ऊस लागवड क्षेत्रात १.९ टक्क्यांची (४९.३८ लाख हेक्टर) वाढ नोंदवण्यात आली.

१७ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कडधान्यांत १.०६ लाख हेक्टर क्षेत्रात तूर पेरण्यात आली तर ५३ हजार हेक्टरवर उडीद पेरण्यात आला. ३.२ लाख हेक्टर क्षेत्रात भुईमूग (Ground Nut) घेण्यात आला. ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. तृणधान्यांपैकी ४.९६ लाख हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली. ४५ हजार हेक्टरवर बाजरीची आणि ३६ हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली.

Kharip Sowing
मसाला उद्योगाने 'ब्रँड इंडिया'वर भर देण्याची गरज

उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांतील खरीपातील लागवडीचे क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा किंचित जास्त असल्याचे या आकडेवारीत नमूद केले.गुजरातमध्ये १.३३ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची (Cotton) लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी गुजरातमधील कापसाचे क्षेत्र ०.९९ हेक्टरपुरतेच सीमित होते. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २.७ लाख हेक्टर क्षेत्रात कापूस घेण्यात आला होता, यंदा १७ जूनपर्यंत ५३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली.

हरियाणात गेल्यावर्षी ६.६६ लाख हेक्टरवर कापूस घेण्यात आला होता या तुलनेत यंदा ६.२५ लाख हेक्टरवर कापूस घेण्यात आला. राजस्थानातील गेल्यावर्षीच्या ४.७४ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ४.७३ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालीय. पंजाबमध्ये गेल्यावर्षी २.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कापूस घेण्यात आला यंदा केवळ २.४८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील कापूस लागवडीचे क्षेत्र वाढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com