Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

जळगाव, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather UpdatesAgrowon

पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. जून महिन्यातील दडीनंतर जुलै महिन्यातील पावसाने (Rain) समाधानकारक हजेरी लावली आहे. घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. तर मराठवाडा, विदर्भात चांगल्या पाऊस पडत असून, कोकणात जोर कमी झाल्याचे दिसून आले. (Maharashtra Weather Updates)

गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यातील (Marathwada) हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतशिवारात पाणी शिरले आहे. सोयबीनसह खरिपाची पिके (Kharip Crops) पाण्याखाली गेली असून, फळबागांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत चांगला पाऊस झाला. विदर्भातही अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला.

धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमध्ये लवकरच समाधानकारक पाणीसाठा होणार आहे. जळगाव, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

रविवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : जव्हार ८७, मोखाडा ८०.

रायगड : कर्जत ९०,महाड ७४, माथेरान ७७, रोहा ७२, पोलादपूर ७२, सुधागडपाली ५२.

रत्नागिरी : चिपळूण ७५, खेड ८०, लांजा ५२, मंडणगड ५०, राजापूर ५०, संगमेश्वर ७४, वाकवली ५२.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग ६६, सावंतवाडी १५१, वैभववाडी, वेंगुर्ला,

ठाणे : भिवंडी ५६, शहापूर ५०, ठाणे ५१, उल्हासनगर १०८.

मध्य महाराष्ट्र :

नगर : अकोले ४१.

धुळे : शिरपूर ५५.

जळगाव : भाडगाव ४६, दहीगाव ९३, एरंडोल ५३, जळगाव ७८, यावल ४३.

कोल्हापूर : आजरा ५८, गडहिंग्लज ४६, गगणबावडा ५६, गारगोटी ४५, पन्हाळा ४८, राधानगरी ७१, शाहूवाडी १२९.

नंदूरबार : अक्कलकुवा ८५, अक्रणी ४०, नंदुरबार ८४, तळोदा ४२,

नाशिक : दिंडोरी ६८, हर्सूल १०८, इगतपुरी २४०, कळवण ४४, नाशिक ६२, ओझरखेडा ५७, पेठ १२५, सटाना ५३, सुरगाणा १२०, त्र्यंबकेश्वर ९४.

पुणे : घोडेगाव ५०, भोर ५५, जुन्नर ७१, राजगुरुनगर ५५, लोणावळा कृषी १२४, पौड ८०, वडगाव मावळ ९७, वेल्हे ९६.

सातारा : महाबळेश्वर १७४, पाटण ७४.

मराठवाडा :

औरंगाबाद : औरंगाबाद ६२, सोयगाव ७१.

जालना : पातूर ५६.

लातूर : अहमदपूर ३३, चाकूर ३१, देवणी ३१, जळकोट ३५, उदगीर ३८.

नांदेड : अर्धापूर ४१, भोकर १०४, बिलोली ६६, देगलूर ५६, धर्माबाद ११६, हदगाव ४९, हिमायतनगर ५९, कंधार ५४, किनवट १०३, माहूर ६३, मुखेड ५१, उमरी १०४.

उस्मानाबाद : परांडा ३२.

परभणी : मानवत ६१, पालम ३०,सेलू ६०.

विदर्भ :

अमरावती : चांदूर रेल्वे ३२, चिखलदरा ४३, धामणगाव रेल्वे ५७, तिवसा ४७.

भंडारा : लाखंदूर ३१.

चंद्रपूर : चंद्रपूर ५४, गोंडपिंपरी ६६, जेवती ७५, कोर्पणा ४३, मूल १०३, पोंबुर्णा ७८, राजापूर ४१, सावळी ५६, वरोरा ६६.

गडचिरोली : अहिरी १३०, चामोर्शी १२०, एटापल्ली ६१, मुलचेरा २०६.

नागपूर : कळमेश्वर ४८, पारशिवनी ४३, सावनेर ६५.

वर्धा : आर्वी ४६, आष्टी ४५, देवळी ७५, हिंगणघाट ६६, समुद्रपूर ५२, वर्धा ९७.

वाशिम : मानोरा ५७.

यवतमाळ : बाभुळगाव ५२, कळंब ५०, मारेगाव ७२, पांढरकवडा ४०, राळेगाव १०५, वणी ९२. झारी झामणी ४२.

  • - मराठवाड्यात जोर कायम, पिकांचे नुकसान

  • - नांदेड नद्यांचे पाणी घुसले शेतशिवारात

  • - वाशीम जिल्ह्यात शेंदुर्जना, गिरोली येथे अतिवृष्टी

  • - अकोला, बुलडाणा जिल्ह्यात हलका पाऊस

  • - उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस

  • - चांदोलीत मुसळधार, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर

  • - दमदार पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

१०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) :

सावंतवाडी १५१ (जि. सिंधुदुर्ग), उल्हासनगर १०८ (जि. ठाणे), इगतपुरी २४०, हर्सूल १०८, पेठ १२५, सुरगाणा १२० (जि. नाशिक) शाहूवाडी १२९ (जि. कोल्हापूर), लोणावळा कृषी १२४ (जि. पुणे), महाबळेश्वर १७४ (जि. सातारा), भोकर १०४, धर्माबाद ११६, किनवट १०३, उमरी १०४ (जि. नांदेड), मूल १०३ (जि. चंद्रपूर), अहिरी १३०, चामोर्शी १२०, मुलचेरा २०६ (जि. गडचिरोली), राळेगाव १०५ (जि. यवतमाळ).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com