आसाममध्ये पूर व भूस्खलनाच्या बळींची संख्या ९ वर

सात लाखांहून अधिक लोक बाधित
Assam Flood
Assam FloodAgrowon

गुवाहाटी : आसाममध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) थैमान घातले असून संपूर्ण राज्यातील लाखो लोकांना मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि भूस्खलनाचा (Land Sliding) फटका बसला आहे. आतापर्यंत राज्यातील २९ जिल्ह्यांतील ७ लाख १७ हजार ४६ लोक पूरस्थितीमुळे (Flood Affected) बाधित झाले आहेत. तर राज्यात आलेला पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, नागाव जिल्ह्यात सुमारे २.८८ लाख लोक बाधित झाले आहेत, त्यानंतर कचरमध्ये १.१९, होजईमध्ये १.०७ लाख, दारंगमध्ये ६० हजार ५६२, बिस्वनाथमध्ये २७ हजार २८२ आणि उदलगुरी जिल्ह्यात १९ हजार ७५५ लोक बाधित झाले आहेत. आसाममधील पूरस्थिती बुधवारी (ता. १८) आणखीनच बिघडली असून आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे.

४८ हजार हून अधिक लोकांनी आसामच्या विविध जिल्ह्यांतील १३५ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, तर पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी राज्यभरात ११३ वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे आसाममधील बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्हा आणि त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या शेजारील राज्यांचा रेल्वे आणि रस्ते संपर्क विस्कळीत झाला आहे. बाधित लोकांच्या मदतीसाठी हवाई दलाने दिमा हासाओ येथे आवश्यक साहित्य पोहोचवले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com