Cashew : आडाळी येथे आगीत हजार काजू कलमे खाक

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात लागलेल्या आगीत सुमारे चार ते पाच हजार काजूच्या झाडांचे नुकसान झाले.
Cashew
CashewAgrowon

Sindhudurag Kaju Baag fire : जिल्ह्यातील आडाळी (ता. दोडामार्ग) येथे लागलेल्या आगीत उत्पादनक्षम काजूची (Kaju) एक हजार कलमे खाक झाली. या आगीत (Aag) बागायतदारांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले.

ही आग शॉर्टसर्किटमुळे (shortcircuit Fire) लागल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात जिल्ह्यात लागलेल्या आगीत सुमारे चार ते पाच हजार काजूच्या झाडांचे नुकसान झाले.

डिसेंबर, जानेवारी महिन्यात जिल्ह्यात वणवासत्र सुरू होते. जिल्ह्यातील पडीक माळरानावर मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत या महिन्यांत पूर्णतः सुकलेले असते. शॉर्टसर्किट किवा अन्य कारणांमुळे आग लागल्यास ती आटोक्यात आणता येत नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा ते सात वेळा लागलेल्या आगीत चार-पाच हजार काजूची झाडे जळाली. गुरुवारीदेखील (ता. १६) आडाळी येथे माळरानाला आग लागली.

Cashew
Cashew Crop Damage : जोरदार वाऱ्याचा काजू पिकाला तडाखा

शेकडो एकर माळरान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वाऱ्यामुळे आगीचा भडका उडून आग काजुबागांमध्ये शिरली. त्यात काजू व नारळाची शेकडो झाडे जळाली.

यात गणपत परब यांची ३०० काजू कलमे, रूपेश जाधव यांची २५०, भगवान जाधव यांची १००, तर उदय गावकर यांची २०० तर रेश्मा जाधव यांची २०० असे एकूण एक हजार झाडांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले.

‘महावितरण’चे अधिकारी व सरपंच पराग गावकर यांनी नुकसानीची पाहणी केली. पंचनामे करून ‘महावितरण’ने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सरपंच गावकर यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com