साखर परिषदेतील पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

‘व्हीएसआय’मध्ये शनिवारपासून राज्यस्तरीय साखर परिषद
साखर परिषदेतील पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
Sharad PawarAgrowon

पुणे ः राज्यस्तरीय साखर परिषदेच्या (State Sugar Conference) निमित्ताने साखर कारखान्यांच्या (Sugar Mills )आगामी वाटचालीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) नेमके काय भाष्य करतात, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून आहे. साखर उद्योगातील पवार यांच्या गौरवास्पद कामगिरीवर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक या परिषदेत प्रकाशित केले जात आहे.

‘व्हीएसआय’मध्ये शनिवारपासून (ता. ४) सुरू होत असलेल्या या दोनदिवसीय साखर परिषदेच्या निमित्ताने साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी वार्ताहरांना माहिती दिली. या वेळी संचालक संभाजी कडू पाटील उपस्थित होते.

उद्‌घाटन सोहळ्यात पवार यांच्या योगदानाचा आढावा घेणारे ‘आधारस्तंभ’ नावाचे पुस्तक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर साखर उद्योगाच्या स्थिती व वाटचालीबाबत स्वतः पवार आपली निरीक्षणे मांडणार आहेत. याशिवाय श्री. गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडून साखर उद्योगाबाबत मते मांडली जातील.

परिषदेत पहिल्या दिवशी होत असलेली भाषणे व विषय असे ः रेणुका शुगर्सचे रवी गुप्ता (साखर उद्योगातील महसुली सुधारणा), साखर आयुक्त शेखर गायकवाड (साखर उद्योगातील प्रशासकीय सुधारणा), साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे (केंद्र व राज्याकडून साखर उद्योगाच्या अपेक्षा), माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव (ग्रीन हायड्रोजन), ए. डी. बोखारे (साखर उद्योगातील भविष्यकालीन नावीन्यता), डॉ. एस. व्ही. पाटील (इथेनॉलच्या पलीकडे), डॉ. रमेश हापसे (ऊस जाती), डॉ. भरत रासकर (पाडेगाव संशोधन केंद्रातील नवे वाण), एस. एस. कटके (ऊस बेणे), बी. बी. ठोंबरे (उपपदार्थांची वाटचाल), विद्याधर अनास्कर (आर्थिक व्यवस्थापन), रामचंद्र माहुली (उत्पन्नाचे स्रोत), डॉ. यशवंत कुलकर्णी (खर्च नियंत्रण).

या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी होणारी व्याख्याने अशी ः डॉ. बी. बी. काळे (कृषी तंत्रज्ञान), डॉ. बी. डी. भोकरे (क्षारयुक्त जमिनी), गणपतराव पाटील (दत्त पॅटर्न), डॉ. ए. एम. नवले (सूक्ष्मजीवांची उपयुक्तता), डॉ. राजीव दाणी (साखर प्रक्रिया), राजेंद्र चांदगुडे (शाश्‍वत साखर कारखानदारी), डॉ. काकासाहेब कोंडे (इथेनॉल), डॉ. दीपाली निंबाळकर (प्रदूषण नियंत्रण), संजय खताळ (ऊस तोडणी व समस्या), डॉ. पी. पी. शिंदे (सूक्ष्मसिंचन), सुभाष जमदाडे (ड्रोन्स), चारुदत्त देशपांडे (इथेनॉल), डी. एम. रासकर (सीबीजी), घनश्याम देशपांडे (जैवइंधन)

परिषदेचा समारोप रवींद्र एनर्जीचे संचालक नरेंद्र मुरकुंबी यांच्या भाषणाने होणार आहे. या सत्राचे अध्यक्षस्थान व्हीएसआयचे उपाध्यक्ष व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भूषविणार आहेत. या वेळी शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरणदेखील होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com