वाचन विकासाची पद्धती रूढ करणारं ‘ग्रंथाचिया द्वारी’

ज्येष्ठ साहित्यिक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेले ‘ग्रंथाचिया द्वारी- जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा’ हे पुस्तक विश्‍वकर्मा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. उत्तमोत्तम ग्रंथांची निवड करून त्यांचं मर्म या पुस्तकातून मांडलं आहे. या पुस्तकाद्वारे देऊळगावकर वाचकाला सजग व उन्नत करतात. इतकंच नाही तर त्याला खडबडून जागंही करतात. त्याच्या मनात प्रश्‍नही निर्माण करतात आणि त्यातून वाचन विकासाची पद्धती सादर करतात.
Book Review
Book ReviewAgrowon

वाचन महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहायचं पण त्यासाठी ठोस काहीही करायचं नाही, यातून आपलं भविष्य कसं घडणार? आपण एखादा विचार सर्वदूर कसा पोहोचवता येईल, याची पद्धत वा शास्त्र तयार करण्याचा विचार कधीही केला नाही. एक पुस्तक किंवा पुस्तकातील विचार कोणापर्यंत व कसा पोहोचेल? त्याचा त्या विचारांच्या बाजूने व विरोधात असणाऱ्यांवर काय परिणाम होईल? हे कसं जाणता येईल ? त्या विचारांत तसूभर का असेना वाढ व्हावी अशी पुस्तकाकडे नेणारी पद्धत आपण तयार केली नाही. थोडक्यात, वाचनवाढ व्हावी यासाठी आपण पद्धतशीरपणे काहीच केलं नाही.

Book Review
Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

आपण शिकतो आणि वाचायला लागतो. याच्या उलट कलांचं आहे. संगीताचा कान तयार व्हावा लागतो. तुमची दृष्टी विकसित झाली असेल तर तुम्ही चित्र बघू शकता. म्हणजे कला उमजून घेण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं शिक्षण आवश्यक असतं. पुस्तकाच्या आत्म्याला स्पर्श करता येईल, असं वाचन विकसित करण्यासाठी अशी पद्धत का नसावी? मराठी संस्कृतीचं दारिद्र्य हे आहे, की आपण याबाबतीत काहीही काम केलेलं नाही. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या ऐरणीवर वाचन विकास हा मुद्दा कधीही येऊ शकला नाही.

Book Review
Cotton : नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

शाळा, कॉलेजमधून तसंच सर्वसामान्य वाचकांपर्यंत जाऊन वाचन विकासाचा आरंभ करणे, हे आपल्याला शक्य नव्हतं? आपल्याकडे असंख्य वाचनालयं असून, त्यांत भरपूर पुस्तकं आहेत. तरीही वाचन विकास करायचा असतो, या दृष्टीचा अभाव आहे. वाचकाची वाचन अभिरुची वाढावी आणि ती आपली जबाबदारी आहे; त्यासाठी प्रशिक्षण विकसित केलं पाहिजे, असा विचार होताना दिसत नाही.

या पार्श्‍वभूमीवर ‘ग्रंथाचिया द्वारी- जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा’ या पुस्तकाद्वारे अतुल देऊळगावकर वाचकाला सजग व उन्नत करतात. इतकंच नाही, तर त्याला खडबडून जागंही करतात. त्याच्या मनात प्रश्‍नही निर्माण करतात आणि त्यातून वाचन विकासाची पद्धती सादर करतात.

आपल्या वाचनात काही क्रम असू नये का? समजा आपण पहिल्यांदा नारायण धारप वाचले. नंतरच्या काळात हातात पडेल ते वाचत गेलो तर... तो वाचक मोकाट पद्धतीने जात मोकाट वाचक होणार. ‘ग्रंथाचिया द्वारी’ हे पुस्तक वाचन विकास चळवळीच्या शास्त्राचा आरंभबिंदू आहे, असं मला वाटतं. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे एकत्र परिचय देत देऊळगावकर आपल्याला ‘ग्रंथाच्या द्वारी’ नेऊन सोडतात.

वाचनाचा उद्देश काय असावा? विरंगुळा, वेळ घालवणे की ज्ञानाच्या कक्षांचा विस्तार? प्रत्येकानं आपली प्राथमिकता कधीतरी ठरवणं आवश्यक आहे. वाचनाने व्यक्तीला उन्नत केलं पाहिजे, बदललं पाहिजे आणि त्याहून महत्त्वाचं ‘जग बदलण्याची जबाबदारी ही वाचकावर असते’, याचं भान त्याला आणून दिलं पाहिजे. यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक मोलाचं आहे.

इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि पर्यावरण हे विषय एकमेकांत हात गुंफून येतात. संगीत, चित्र, वास्तुकला व चित्रपट या कला परस्परावलंबी आहेत. देऊळगावकर याची जाणीव करून देतात. त्यासाठी ते उत्तमोत्तम ग्रंथांची निवड करून त्यांचं मर्म आपल्या हातात ठेवतात. त्यामुळे प्रत्येक विषयांचा केवळ परिचय न होता त्या त्या विषयातील कळीचे प्रश्‍न व सिद्धांत ध्यानात येतात. आपण नकळत विचार करू लागतो. एकंदरीत या पुस्तकामुळे मराठी वाचन चळवळीस पुढे नेण्यासाठी अतिशय आवश्यक अशी सैद्धांतिक सिद्धांत मांडणी झाली आहे. हे एक ऐतिहासिक महत्त्वाचं पुस्तक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com