Rain Update : जुलै महिन्यात पाऊस सरासरी गाठणार

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. जुलै महिन्यात पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : जून महिन्यात पावसाने दडी (Rain) मारल्यानंतर जुलै महिन्यात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. जुलै महिन्यात पाऊस सरासरी (Average Rainfall) गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात ९४ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी (ता.१) जाहीर केला. उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागासह दक्षिण द्वीपकल्पाच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पूर्व, ईशान्य आणि मध्य भारताच्या पूर्व, दक्षिण द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

हिमालयाचा पायथा आणि दक्षिण भारतातील राज्य वगळता उर्वरित देशात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशभरात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहणार आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ‘ला-निना’ स्थिती कायम असून, जुलै ते सप्टेंबर या काळात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक होण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज विचारात घेता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com