Bailgada Sharyat: पुन्हा एकदा भिर्रर्रर्रर्रर्र...

Bailgada Sharyat
Bailgada SharyatAgrowon


- संतोष डुकरे


भंडार उधळणार आता घाटाघाटातून...
चौका वशिंडातून... काती शेपटावरुन...

जग जिकल्याच्या अविर्भावात
होतील लाखांचे सौदे
जहाल जित्राबासाठी
आणि गव्हाणीत पडतील शेंगदाणे
पेंड खुराकाची पोती रिती

पाटी पेन्सळ सोडून
पोरांच्या हाती परत कासरं येतील
बापाच्या नादासाठी
पोरं गुलाल खोबरं उधळतील... घाटाघाटात

Bailgada Sharyat
Bailgada Sharyat : भिर्रर्र... सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

शिक्यावरल्या टोपल्यात भाकर की तुकडा...
कुणास ठावूक...
बायको रानात का आजारात...
कुणास ठावूक...
पोरं मात्र बैलगाड्यामागं...
कधी अजान उत्साह, कधी सजान फरपट

गाडं बंद झालं म्हणून सुखावलेल्या बाया
गोठ्यातल्या गाया बाजारी गेल्यावर
हलगीच्या तालावर घाटात खिसं रितं झाल्यावर
कधी शिंगं तुटल्यावर, बैल मोडल्यावर
नवरा कासऱ्यात पाय अडकून सोलपटल्यावर
पोरगं गाड्याखाली सापडल्यावर
धनिकांच्या, नादिकांच्या छंदापायी, नादापायी
पावलोपावली गाळात चाललेलं घर पाहून
कडकडा बोटं मोडतील
उभ्या सरकाराच्या नावानं...

शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे मारेकरी
कदाचित तेव्हाही हसतील क्रूर अतिव समाधानानं
बैलाच्या नादात माणसांना गाड्याला जुपून
पुन्हा जुकाट खांदी मारल्याच्या आनंदान...

आमचे तथाकथित पुढारी तेव्हाही मश्गुल असतील
श्रेयाच्या राजकारणात... खाज खरूज गजकर्णात...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com