Farmer Loan : शेतकऱ्यांना कर्ज देण्यापूर्वी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हा, फडणवीसांनी दिले निर्देश

Cibil Score : पीक कर्ज वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर आग्रह करणाऱ्या बँकांना एफआयआरला सामोरे जावे लागेल, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Loan
LoanAgrowon

Farmer Credit Score : पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची (cibil score) अट लागू करता येणार नाही, असा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीने (Banking Committee) घेतला आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप (Crop loan) करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा (FIR ) दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी स्पष्ट केले.

त्याबाबत रिझर्व्ह बँकेने (RBI) परिपत्रकही जारी केले आहे, असे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पूर्व विभागासाठी अमरावती (Amaravati) येथे झालेल्या हंगाम आढावा बैठकीनंतर सांगितले.

Loan
Farmer Loans : मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ

जर एखादी बँक पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागताना आढळली, तर अशा बँकेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

Loan
NDCC Loan Recovery : थकीत कर्ज वसुलीसाठी बँक कर्मचारी आक्रमक

अमरावतीमधील काही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली अनुदानाची रक्कम कर्ज परतफेडीकडे वळवली आहे. सर्वच बँका ते करत नाहीत, पण काही बँकामध्ये असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जवसुलीसाठी अनुदानाची रक्कम वापरू नये, असे सक्त आदेश मी बँकांना दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सिबिल स्कोअरची अट लागू करता येणार नाही, असा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीने आधीच घेतला आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने परिपत्रकही जारी केले आहे. तरीही काही बँकांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे आढळून येत आहेत. अशा बॅंकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com