Minister Dr. Tanaji Sawant : बँकांनी पीककर्ज देताना सीबिल स्कोअरची अट घालू नये

Farmer CIBIL : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी सीबिल स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना ऐन पेरणीकाळात अडचणीत आणू नये.
Tanaji Sawant
Tanaji SawantAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी सीबिल स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना ऐन पेरणीकाळात अडचणीत आणू नये. राज्य शासनाने किंवा संबंधित यंत्रणेने अशी अट घातलेली नाही. या वर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घ्यावी. बोगस कृषी निविष्ठा विक्री करणांवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खरीप हंगाम २०२३ जिल्हास्तरीय आढावा बैठक गुरुवारी (ता. ११) दुपारी घेण्यात आली. या वेळी दूरदृश्‍य संवादप्रणालीद्वारे पालकमंत्री डॉ. सावंत सहभागी झाले होते.

खासदार फौजिया खान, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे दूरदृश्‍य संवादप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एस. चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी आर. बी. हरणे यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Tanaji Sawant
Farmer CIBIL Score : पीककर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा

सावंत म्हणाले, की यंदा राज्यातील पर्जन्यमानावर अल-निनोचा प्रभाव राहणार असून, जिल्हाप्रशासनाने हवामान केंद्रांशी समन्वय ठेवत कृषी विभागाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. पुरेशा पावसानंतर पेरणी बाबत माहिती द्यावी.

कृषी सहायकांपासून प्रगतिशील शेतकऱ्याचे विविध गट तयार करावेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनाही सहभागी करुन घ्यावे. बोगस बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आगामी खरीप हंगामात कृषी विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची आकस्मिक तपासणी करावी.

बोगस निविष्ठा विक्री करतांना आढळून आलेल्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात फळबाग, तुती लागवडीला प्रोत्साहन द्यावे.त्यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष घालावे. शाश्‍वत सिंचनाच्या माध्यमातून शेतीला पाणीपुरवठा व्हावा, दिवसा वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे आणि सौरऊर्जा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

कृषिपंपाची वीजजोडणी समाधानकारक नसल्यामुळे ३१ पर्यंत त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेशही या वेळी त्यांनी दिले. या वेळी सावंत यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

या वेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत पीकविम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याप्रकरणी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com