
Wardha News : सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट देणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख २६ हजार ३५५ पर्यटकांनी आश्रमाला भेट दिली आहे.
महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, या आर्थिक वर्षात २ लाख २६ हजार ३५५ पर्यटकांनी आश्रमाला भेट दिली.
भेटी देणाऱ्यात अनेक पालक, विद्यार्थी देखील आश्रमाला भेट देतात. गांधीजी खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी ते भेट देतात. त्यामुळेच दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी गेल्या आर्थिक वर्षात आश्रमाला भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आश्रमाला भेट देणाऱ्यांमध्ये अती महत्त्वाच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. त्यामध्ये छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उईके, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फिजीचे राजदूत कमलेश स्वरूप, लोकसभा खासदार शशी थरूर, गांधीजींच्या नात सुमित्रा गांधी कुळकर्णी व तारा गांधी भट्टाचार्य अशा अनेकांचा समावेश आहे.
महिनानिहाय पर्यटक
एप्रिल - ९५१४
मे - १५३०५
जून - १७५३४
जुलै - ९९८८
ऑगस्ट - १३८७६
सप्टेंबर - १२५६३
ऑक्टोबर - २६०२९
नोव्हेंबर - २३७०२
डिसेंबर - ३१५१५
जानेवारी - ३२५५०
फेब्रुवारी - १९७०९
मार्च - १४८११
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.