Sugarcane Worker : बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांपर्यंत लाभ पोहोचविणार

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे आहे.
Sugarcane Worker
Sugarcane WorkerAgrowon

Beed News : बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना (Sugarcane Worker) शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे आहे.

यादृष्टीने जिल्ह्यात जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

(ता. २० मे) दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत सदर ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र दिले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात सोमवारी (ता. तीन) ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

Sugarcane Worker
Sugarcane Worker : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संगणक भेट

बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी (बीड) उत्तम पाटील, अपर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दीपा मुधोळ - मुंडे म्हणाल्या, नोंदणी प्रक्रियेत ग्रामसेवक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे. तालुकानिहाय विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्षात मदत करतील.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुधीर ढाकणे, चंद्रशेखर केकाण, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रऊफ शेख, शिक्षणाधिकारी एन. एन. शिंदे, डॉ. एस. आर. कदम, अमित भिंगारे, सुवर्णा निंबाळकर, ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे, आर. जे. शेळके, दीपक नागरगोजे, मनीषा तोकले, तत्त्वशील कांबळे, अॅनी जोसेफ आदींची उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com