
Dhule News : आदिवासींसाठी आनंदाची पर्वणी असणाऱ्या भोंगऱ्या उत्सवास (Tribal Bhongrya Festival) शिरपूर तालुक्यातील पनाखेड, दहिवद व कोळीद येथे थाटात सुरवात झाली.
या उत्सवात सहभागी झालेले समाजबांधव व तरुणाईने लोकगीत गायन (Folk Music), बासरीवादन व ढोलवादनाचे विविध प्रकार व नृत्याविष्कार सादर करीत आदिवासी संस्कृतीचे (Tribal Culture) दर्शन घडविले.
पनाखेड गावात आठवडेबाजारालाच भोंगऱ्या बाजार भरला. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करण्याचे मोठे ठिकाण आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात आदिवासींची गर्दी दिसून आली. दिवसभरात या उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
सकाळपासूनच सातपुड्याच्या डोंगर-दऱ्यांतून व परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून, तर काही मिळेल त्या वाहनातून या उत्सवात सहभागी झाले होते.
गैरसोय टाळण्याचे प्रयत्न
सरपंच करवटीबाई पावरा, उपसरपंच वनसिंग पावरा, माजी सरपंच शिवदास भिल, सदस्य मेरसिंग पावरा, भिका चारण, सामाजिक कार्यकर्ता खुमसिंग पावरा, एकनाथ भिल, सखाराम भिल, पोलिस पाटील रवींद्र पावरा, भिसन पावरा आदींनी भोंगऱ्यात आलेल्या बांधवांची गैरसोय होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेतली.
भोंगऱ्या बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सांगवी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नजर ठेवून होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.