Water Supply Scheme : केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ११ गावे आणि ३१ वाड्यांना उपयुक्त ठरणार आहे. ‘‘या योजनेत सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार असल्याने ही योजना अधिक उपयुक्त ठरणार आहे
Chandrakant Patil
Chandrakant PatilAgrowon

पुणे ः केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) ११ गावे आणि ३१ वाड्यांना उपयुक्त ठरणार आहे. ‘‘या योजनेत सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार असल्याने ही योजना अधिक उपयुक्त ठरणार आहे. ग्रामस्थांनी या योजनेची देखभाल नीट ठेवल्यास येत्या २५ वर्षांतील वाढत्या लोकसंख्येसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Chandrakant Patil
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनेसाठी ३८ कोटी

जलजीवन मोहिमेअंतर्गत शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार दिलीप वळसे पाटील, मेघना बोर्डीकर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘या योजनेत सौरऊर्जेचा उपयोग करण्यात येणार असल्याने ही योजना अधिक उपयुक्त ठरेल. केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ११ गावे आणि ३१ वाड्यांना उपयुक्त ठरणार आहे. केंदूर गावच्या तीर्थस्थळ विकासासाठी गरज लक्षात घेऊन निधी देण्यात येईल. गावाच्या शेतीसाठी पाणी मिळण्याबाबत आढावा घेऊन सहकार्य करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी तालुकानिहाय आठवड्यात एक तालुक्यातील गावांच्या विकासाबाबत आढावा घेण्यात येईल.’’

आमदार वळसे पाटील म्हणाले, ‘‘गावाच्या विस्तारानुसार पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारने योजनेला निधी दिल्याने केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे.’’ खासदार श्रीकांत शिंदे, आमदार श्रीमती बोर्डीकर आणि माजी खासदार पाटील यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन. एन. भोई, उपअभियंता श्रीकांत राऊत, शाखा अभियंता मिलिंद रोकडे, निर्मला पानसरे, सुभाष उमाप, सविता बगाटे, सरपंच मारुती शेळके, अविनाश साकोरे, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अशी आहे केंदूर पाबळ पाणीपुरवठा योजना जलजीवन मोहिमेअंतर्गत केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये केंदूर, महादेववाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, थिटेवाडी, पाबळ, चौधरीबेंद, फुटाणेवाडी-आखरमाळ,माळवाडी-आगरकरवाडी, थापेवाडी-पिंपळवाडी, झोडगेवाडी या ११ गावांसोबतच ३१ वाड्यांतील २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना योजनेचा फायदा होणार आहे. योजनेच्या कामासाठी ५९ कोटी ४५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com