
Nagar News : ‘‘साकळाई योजनेची जबाबदारी माझी आहे. मी दिलेला शब्द नेहमीच पूर्ण करतो. वाळकी येथे मी दिलेल्या शब्दाचीही जाणीव आहे. जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) साकळाई पाणीयोजनेच्या सर्व्हेच्या सूचना दिल्या आहेत.
त्यासाठी निधीची तरतूद येता आठ ते दहा दिवसांत करण्याची जबाबदारी घेतली आहे. लवकरच साकळाई योजनेचा भूमिपूजन समारंभ घेणार आहे,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले.
प्रवरानगर लोणी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी साकळाई योजना कृती समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, साकळाई योजना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, सुरेश काटे, सोमनाथ धाडगे, डॉ. योगेंद्र खाकाळ, ज्ञानदेव भोसले, जितेंद्र निकम, बी. एस. वाळके व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगर, श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावाला उपसिंचन योजनेतून कुकडीचे पाणी मिळावे यासाठी साकळाई सिंचन योजना करण्याची मागणी आहे. नगर आणि श्रीगोंदे तालुक्यांतील ३२ गावांसाठी ही योजना फलदायी ठरणार आहे.
आता उपमुख्यमंत्र्यांनी या साकळाई पाणीयोजनेची जबाबदारी स्वतः स्वीकारल्याने या भागातील शेतकरी बांधवांत पुन्हा उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.