Raksha Bandhan:चंद्रकांत पाटील यांच्यासाठी राहीबाई पोपेरे यांची बीज राखी

पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (rahibai popere) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे.
Rakhsa Bandhan
Rakhsa BandhanAgrowon

नगरः ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया!’ या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. अगदी या गीताला शोभेल असेच तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (rahibai popere) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे.

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा (Seeds) वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या (Seed Bank) रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे.

राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे.

चंद्रकांत पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाईसुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रुत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे.

बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com