
Pune By Election News : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा ३६ हजार ७० मतांच्या आघाडीने विजय झाला.
पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या आश्विन जगताप यांनी महाविकास आघाडीचे नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचा पराभव केला.
एकूण ३६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासून जगताप आणि काटे यांच्या चुरशीची लढाई सुरू होती. अखेर संध्याकाळी साडे पाच वाजता निकाल हाती आला. या निकालात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना एकूण १ लाख ३४ हजार ५९४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा ९९ हजार ४२४ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळाली.
महाविकास आघाडीने कसबा मतदार संघ खिशात टाकल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पराभवाला समोरे जावं लागलं. भाजपचे पिंपरी चिंचवड मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे आजाराने निधन झाले.
त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. भाजपने पूर्ण ताकद अश्विनी जगताप यांच्या पाठीशी उभी केली होती.
महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवडमधील नाना काटे यांना उमेदवारी दिली. काटे यांना उमेदवारी दिल्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला. त्याचा फटका मतदानात महाविकास आघाडीला बसल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने जराशीही कसर सोडली नव्हती. या दोन्ही जागांसाठी दोन्ही सर्वच पक्षाने जंग पछाडले होते. राष्ट्रीय नेत्यांपासून सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.