
Organic Farming : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपप्रणीत किसान मोर्चा देशभरात कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या मर्यादित वापराबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी यात्रा काढणार आहे.
ही यात्रा एक लाख गावांमधून जाणार असून एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे किसान मोर्चाचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
केंद्र सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी किसान मोर्चाकडून यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराचा आणि धोरणांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, याची जागृती यात्रेद्वारे करण्यात येणार आहे.
या यात्रेची सुरुवात गंगा नदीच्या किनाऱ्यावरून करण्यात येणार आहे. त्यासाठी किसान मोर्चाचे राज्य निमंत्रक आणि सह-संयोजक यात्रेची बांधणी करतील.
तसेच किसान मोर्चाकडून १३ फेब्रुवारी रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
सेंद्रिय शेती व भरडधान्य वापराबाबत प्रबोधन करण्यासाठी व त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये किसान मोर्चाकडून विविध शास्त्रज्ञ, पोषणतज्ञ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणानंतर किसान मोर्चाकडून विविध जिल्ह्यांमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत.
पुढील महिन्यात उत्तरप्रदेश येथील शुक्रतालपासून जनजागरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
या मोहिमेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सहभागी होणार आहेत. त्यानंतर गावपातळीवर यात्रा सुरू करण्यात येणार.
या यात्रेमध्ये भाजपचे व किसान मोर्चाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि रासायनिक खतांच्या वापराबद्दलची माहिती देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आव्हान करणार आहेत.
केंद्र सरकार सेंद्रिय शेती आणि भरडधान्य उत्पादनाचे महत्त्व या यात्रेतून पटवून देण्याचे प्रयत्न करत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.