पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचा टाहो मोर्चा

पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचा टाहो मोर्चा
Kolhapur FloodAgrowon

कोल्हापूर : ‘‘पूरग्रस्तांना (Flood Affected) न्याय मिळालाच पाहिजे. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने (BJP) बुधवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा कोणत्याही उपाययोजना दिसत नाहीत, असा आक्षेप नोंदवत भाजपने सुस्त महापालिका प्रशासन आणि मुर्दाड राज्य शासन पुराचे वाट बघतोय का, असा सवाल केला.

जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांच्या मागण्या व नुकसानभरपाई संदर्भात दोन दिवसांत श्‍वेतपत्रिका काढावी. ज्या पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनी भाजप कार्यालयात संपर्क साधावा. त्यांच्या वतीने भाजप प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा करेल. पूरग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजय एस. पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, भगवान काटे, महिला आघाडीच्या गायत्री राऊत आदी उपस्थित होते. मोर्चा दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, भरपाई मिळालीच पाहिजे, ‘महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय, खाली डोकं, वर पाय’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजवर्धन निंबाळकर, माजी नगरसेवक राजू शेळके, विजय खाडे, अजिंक्य चव्हाण, किरण नकाते, संदीप कुंभार, विजय अग्रवाल आदींचा सहभाग होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com