Mahila Bachat Gat : महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग करावे

महिला बचत गटांच्या माध्यमातून सहकार चळवळीला गती येत असून, आपण नगर जिल्ह्यात व मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात ही चळवळ गतीमान केली.
Mahila Bachat Gat
Mahila Bachat GatAgrowon

Solapur News : महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या उत्पादनांचे महिलांनी ब्रॅंडिंग करावे. ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न करावा. या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

आपण त्यासाठी सोलापूर येथे जागा व आर्थिक तरतूद करू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrishna Vikhe) पाटील यांनी अकलूज (ता. माळशिरस) येथे दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव उद्योजक महिला, महिला बचत गट कर्जवितरण, बाल आहार व महिला आरोग्य विषयी मार्गदर्शन मेळाव्यात विखे पाटील बोलत होते.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Mahila Bachat Gat
Agriculture Conference Session : विखे पाटील कृषी परिषदेच्या अधिवेशनात अकरा मान्यवरांचा होणार सन्मान

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, की महिला बचत गटांच्या माध्यमातून सहकार चळवळीला गती येत असून, आपण नगर जिल्ह्यात व मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात ही चळवळ गतीमान केली.

या चळवळीला गती देण्यासाठी आपण आवश्यक सहकार्य करू. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करून देऊ.

माजी सभापती वैष्णवीदेवी व शीतलदेवी मोहिते पाटील यांचे या वेळी कौतुक करून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फाउंडेशनने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

या समारंभात विविध स्पर्धातील यशस्वी स्पर्धक व महिला बचत गटांना धनादेश वितरण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभास धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सोमनाथ लामगुंडे, रणजित शेंडे, बाबाराजे देशमुख, सोमनाथ भोसले, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते पाटील, ॲड. मिलिंद कुलकर्णी, ॲड. प्रकाश पाटील, माजी सभापती शोभा साठे आदी उपस्थित होते.

Mahila Bachat Gat
women Empowerment : महिला बचत गटांचा उद्योजक गट करण्याची गरज

‘निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करा’...

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी तालुक्यात ३६०० बचत गट असून, ३९ हजार महिला कार्यरत असल्याचे सांगितले. या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुकास्तरावर निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com