Maharudra Manganale : रोज सकाळी टोपलंभर गाजरं म्हैस खायची...

आस्मानी आणि सुलतानी संकटं शेतकऱ्यांना कायम नाडत आले आहेत. सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण, हे शंभर टक्के खरं आहे.
Buffalo
BuffaloAgrowon

महारूद्र मंगनाळे

Rural Story : मी पाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही गोष्ट. वडिलांनी मळ्यात मोठे चार- पाच वाफे गाजरं लावली होती. त्यावर्षी नेमकी काय जादू झाली माहित नाही; पण गाजरं प्रचंड पिकली.

एवढी गाजरं झाली की याचं आता करायचं काय, हा प्रश्न पडला. कारण ही गाजरं कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं. वडील वैतागून म्हणाले, रोज दुभत्या दोबडाला (म्हैस) गाजरं घालू. जवळपास दोन-अडीच महिने दररोज सकाळी टोपलंभरं गाजरं म्हैस खायची.

आम्ही पिकलेले टोमॅटोही अनेक वेळा जनावरांना खाऊ घातलीत. आमच्या शेतातील कुत्रेही टोमॅटोवर ताव मारीत. कांदा, मेथी, गवारी, वांगे या भाज्या ते वेळोवेळी मुक्त हस्ते वाटत. विक्री अशी नव्हतीच.

Buffalo
Banana Management : शेतकरी नियोजन पीक ः केळी

माझे वडील ५४ एकर कोरडवाहू जमिनीचे मालक होते. गहू, हरभरा, भाजीपाला येईल (हिवाळजोपा) एवढं विहिरीला पाणी होतं. तरीही सुखा-समाधानाचं आयुष्य मात्र ते जगू शकले नाहीत. कारण शेतकरी असणं हा या देशात शाप आहे.

माझ्या वडिलांचं शेतीवर अफाट प्रेम होतं; मात्र आपलं लेकरू शेतीत येऊ नये, असा त्यांचा कटाक्ष होता. आपल्या वाट्याला आलेलं दु:ख, त्रास, विवंचना किमान आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये, अशी त्यांची भावना होती.

कदाचित वडिलांमुळेच मला शेतीची ही तीव्र ओढ निर्माण झाली असावी. म्हणूनच मी शेतीत आहेे. दरवर्षी नव्या उत्साहानं आर्थिक नुकसान सहन करतो. कारण मला निसर्गात राहायचं. मी हे नुकसान सहन करू शकतो.

कारण मी पोटापाण्यासाठी शेतीवर अवलंबून नाही. माझा चरितार्थ शेतीवर चालत नाही. माझ्या व्यावसायिक कामांतून मला मिळकत होते. त्यातून मी शेतीवर खर्च करतो.

मी फक्त शेतीवर अवलंबून असतो तर पाच-सात वर्षांपूर्वीच माझं नाव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आलं असतं. मी माझ्या वडिलांचे सतत आभार मानत असतो. त्यांनी मला शेतकरी न बनू देऊन माझे प्राण वाचवले आहेत.

Buffalo
Onion Bajarbhav : शेतकरी संघटनेचे कांदा होळी आंदोलन

आस्मानी आणि सुलतानी संकटं शेतकऱ्यांना कायम नाडत आले आहेत. सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण, हे शंभर टक्के खरं आहे. सरकारची धोरणं बदलल्याशिवाय शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरणार नाही.

त्याकडे डोळेझाक करून शेतीचं खोटं उदात्तीकरण करणं, शेतकऱ्याला मखरात बसवणं हा व्यवस्थेचा दांभिक धंदा वर्षानुवर्षे सुरू आहे. हे सगळं चित्र बदलत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार कसा?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com