
Nashik News : कृषी विज्ञान केंद्रातर्फे ग्रामीण आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध कृषीपूरक व्यवसायासाठी नियमित प्रशिक्षण दिले जाते. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती (Employment Generation) झाली आहे.
कृषी पूरक व्यवसायाच्या संधी ओळखून रेशम शेतीकडे (Silk Farming) वळावे. यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर भविष्य आहे, असे प्रतिपादन रेशीम तज्ज्ञ डॉ. अधिकराव जाधव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ-कृषी विज्ञान केंद्र, नाशिक व नाशिक ग्रामीण ग्रामविकास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेशीम शेती व संधी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात डॉ. जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्या शाखेचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम होते.
डॉ. निकम म्हणाले, की रेशीम संधी व उत्पादनाचे शास्त्रीय ज्ञान या कार्यशाळेतून घेता येईल. छोट्या व आदिवासी शेतकऱ्यांना यातून हमखास उत्पादन देणारा कृषी पूरक व्यवसाय सुरू करता येईल. देश परदेशातील रेशीम शेती व संधी यावर डॉ. प्रमोद रसाळ यांनी माहिती दिली.
जिल्हा रेशीम अधिकारी सारंग सोरते यांनी राज्य व केंद्र शासनाच्या रेशीम शेतीविषयक योजनांची माहिती दिली. जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक सहायक राकेश जोशी यांनी तुती लागवड व कीटक संगोपन व तांत्रिक बाबी यावर मार्गदर्शन केले.
प्रगतिशील रेशीम उत्पादक नाना जाधव यांनी यशोगाथा मांडली. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजाराम पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारे कार्यक्रम, प्रशिक्षण याची माहिती दिली.
श्री. थैल, पोपटराव माळगावे, सोमनाथ वाघेरे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन एकत्रीकरण केले. डॉ. प्रकाश कदम यांनी सूत्रसंचालन केले. हेमराज राजपूत यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमराज राजपूत, मंगेश व्यवहारे, अर्चना देशमुख यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, नाशिक, निफाड ता तालुक्यांतील ८६ शेतकरी सहभागी झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.