Electricity Substation : वीज उपकेंद्रात कॅपॅसिटर बॅंक सुरू करणार

शेतकऱ्यांना पिकाचा पाण्याचा भरणा करण्याकरिता रात्रीची वीज दिली जाते. पण निफाड परिसरात मात्र हा पुरवठाही पुरेसा दिला जात नाही.
 Electricity
ElectricityAgrowon

Nashik, Nephad News : निफाड तालुक्यातील शेती (Agriculturaal) आणि घरगुती विजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी वीज उपकेंद्रात (Power substation) लवकरच कपॅसीटर बॅंक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वीज वितरणचे उपअभियंता नीलेश नागरे यांनी येथे सांगितले.

नागरिकांनी वीजबिल वेळेवर भरून सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले. शेतीसाठी यापुढे एक दिवसातच वीजकनेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी येथील नगरपंचायत कार्यालयात निफाड शिवार व परिसरातील वीज समस्यांबाबत बैठक बोलावली होती, त्या वेळी ते बोलत होते.

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या निफाडचे गणेश कुशारे व नीलेश नागरे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

 Electricity
Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा वीज न दिल्यास आंदोलन करणार

अनिल पाटील कुंदे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना सांगितले, की मागील काळात मागेल त्याला वीजकनेक्शन असा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळेस सर्वांनी कनेक्शन घेतले आहे, त्यामुळे निफाड परिसरात बोगस कनेक्शनचे प्रमाण नगण्य आहे.

त्यात शेतकऱ्यांना पिकाचा पाण्याचा भरणा करण्याकरिता रात्रीची वीज दिली जाते. पण निफाड परिसरात मात्र हा पुरवठाही पुरेसा दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत.

याबाबत तालुक्यात अनेक घटना घडल्या आहेत, त्यात बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी धास्तावले आहेत, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. रात्रीच्या वेळेस विकास पाणी भरण्याकरिता शेतकऱ्याला जीव मोठे धरून जावे लागते.

२०१५ पासून कोब्रा नावाच्या कंपनीने बोगस लाईन टाकली व ३३ किलो वॉटने वीज पोहोचण्याऐवजी फक्त २०-२२ किलो वॉटने वीज शेतकऱ्यांपर्यंत येत आहे. या कंपनी विरोधात कारवाई करावी अशी मागणी सर्वांतर्फे करण्यात आली.

त्यावर नीलेश नागरे यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर बँक शेतीपंपाला बसविण्याची विनंती केली. त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये कॅपॅसिटर बँक चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर शेतीपंपासाठी एक दिवसातच नवीन कनेक्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वांनी वीज जोडणीबाबत व वीजबिल वेळेवर भरण्याबाबत आवाहनही त्यांनी केले. तसेच लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com