Captain Fantastic : कॅप्टन फॅन्टॅस्टिक

मी नुकताच एक फार सुंदर असा सिनेमा पाहिला. सिनेमाचे नाव आहे ‘कॅप्टन फॅन्टॅस्टिक.’ ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Captain Fantastic
Captain FantasticAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

मी नुकताच एक फार सुंदर असा सिनेमा पाहिला. सिनेमाचे नाव आहे ‘कॅप्टन फॅन्टॅस्टिक.’ ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट अशी, की यातला मुख्य नायक बेन (व्हिगो मॉर्टेसन) हा विधुर आहे. त्याची प्रिय पत्नी ही एका मनोविकाराशी झुंज देताना या जगाचा निरोप घेते.

बेन हा म्हटला तर जरा आडमुठा आहे. त्याच्यावर थोरो या विचारवंताचा प्रभाव दिसतो. म्हणजे बेनचा असा विचार करतो की माणसांना शाळा, कॉलेजांची गरजच काय? जे काही शिकायचं असेल ते आपण निसर्गाकडून शिकावं यावर तो ठाम असतो. आपल्या पत्नीवर वैद्यकीय इलाज काम करत नाहीये; तेव्हा बेन एक मोठा निर्णय घेतो, की आपण दोघांनी मुलांसह जंगलात जाऊन राहावं.

Captain Fantastic
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

तेही कायमचं. तसं तो करतो देखील. त्याची सहा मुलं घेऊन तो जंगलात राहतो. एका मोठ्या बसमध्ये सर्व सोयी करवून घेतो आणि जातो मुलाबाळांसह जंगलात राहायला. सोबत चिक्कार पुस्तक घेऊन जातो ज्यात जेरेड डायमंडपासून ते नॉम चोम्स्कीपर्यंत सगळ्यांची पुस्तके असतात. तो मुलांना डावी, उजवी विचारसरणी काय त्यावरचं साहित्य वाचायला देतो. जगातील विविध वाद काय आहेत, त्याबद्दल मुलांकडून अभ्यास करवून घेतो.

Captain Fantastic
Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

मानवी शरीरावरचे डॉक्टरी पुस्तकांपासून ते मुलांना उंच डोंगर दोऱ्या लावून कसे चढायचे, शिकार कशी करायची, संगीताची वाद्य कशी वाजवायची याचं ट्रेनिंग तो मुलांना देतो. यातून ही मुलं प्रचंड हुशार तयार होतात. मुलं मोठी होतात. मग या मुलांच्या हुशारीला पंख फुटायला लागतात. त्यांना कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये जावं वाटतं अन् इथे सिनेमा संपतो.

सिनेमातली नायक बेन याने जसं मुलांच्या बाबतीत निसर्ग आणि आजचं अत्याधुनिक शिक्षण याची सांगड घातली असं काही करण्याचा विचार तरी शिवतो का आम्हाला पालक म्हणून? बरं, या बेनसारखी उदाहरणे नाहीयेत का आपल्याकडे? आहेत की. पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे हे नोकरी सोडून, बायका मुलांवर घरची जबाबदारी सोपवून एक वर्षासाठी नागझिऱ्याच्या जंगलात जाऊन राहिले होते.

कृष्णमेघ कुंटे बारावीत नापास झाले तर आता वर्षभर काय करायचं म्हणून शिष्यवृत्ती घेऊन ते एक वर्ष मदुमलाईच्या जंगलात संशोधनासाठी निघून गेले. मानसशास्त्रही सांगतं की निसर्गापासून जर आपण तुटलो तर आपला बुद्ध्यांकही कमी होतो. तेव्हा निसर्ग आणि येणारा काळ याची आपल्याला सांगड घालावी लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com