Flood Management : संभाव्य पूरस्थितीबाबत सूक्ष्म नियोजन करावे

Disaster Control Room : येत्या १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून याचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे.
Maharashtra Flood control
Maharashtra Flood controlAgrowon

Flood Management Update : कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीला योग्यरीत्या सामोरे जाता यावे याकरिता पूरबाधित तालुक्यांतील तहसीलदारांनी पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्याबाबत सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी रेखावार बोलत होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, की येत्या १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून याचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे. पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल तर येत्या शुक्रवारच्या बैठकीत तहसीलदारांनी त्याची मागणी करावी.

त्याचबरोबर डोंगरी तालुक्यातील भागामध्ये विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ‘दामिनी ॲपद्वारे’ संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे. जिल्ह्यात सध्या काही नवीन अधिकारी बदलून आले असून त्यांनी पूरस्थिती बाधित गावांची त्वरित बैठक घ्यावी.

Maharashtra Flood control
Flood, Drought Management : पूर, दुष्काळ निवारणासाठी ग्रामपंचायतींना कसं बळ द्यायचं?

आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करू नये. हलगर्जीपणा केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, की पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयामध्ये पूरबाधित नागरिकांकरिता बफर स्टॉक स्वरूपात औषध साठा केला असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावीत. त्याचबरोबर नागरिक व पशुधन सुरक्षित राहण्यासाठीचे नियोजन करावे.

पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरून आपत्ती काळाता अडचण येणार नाही, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे श्री. कोळी, डॉ. आंबोकर, डॉ. वाय. ए. पठाण उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com