Jalgaon Market Committee Election Update : बाजार समिती निवडणुकीत जातीय समीकरणे होताहेत वरचढ

खानदेशात बाजार समितीच्या निवडणुकीला वेग आला आहे. मतदारांशी नेते संपर्क करीत आहेत. यातच मंगळवारी (ता. २५) युतीचा (भाजप व सेना) मेळावा नुकताच जळगाव शहरानजीक मोहाडी रस्त्यावर झाला.
Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc ElectionAgrowon

Jalgaon News : खानदेशात बाजार समितीच्या निवडणुकीला वेग आला आहे. मतदारांशी नेते संपर्क करीत आहेत. यातच मंगळवारी (ता. २५) युतीचा (भाजप व सेना) मेळावा नुकताच जळगाव शहरानजीक मोहाडी रस्त्यावर झाला. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

यातच या निवडणुकीत जातीय समीकरणे हावी झाली आहेत. मतदारांचा कौलही आपापल्या जातबंधूंनाच असेल, असा कयास लावला जात आहे. जळगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक कुणबी पाटील किंवा मराठा मतदार आहेत.

मतदारसंख्या २४० एवढी आहे. त्यानंतर कोळी समाजाची मते १६५ एवढी आहेत. तर लेवा पाटीदार समाजातील मतदारांची संख्या १४० पर्यंत आहे. गुर्जर समाजातील मते १०३ एवढी आहेत. ही जातीय समीकरणे लक्षात घेवून युती व आघाडीचे पॅनल तयार झाले आहेत.

Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc Election : बाजार समितीत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणाचा डाव

परंतु या पॅनेलमध्ये मतदार एकास एक मतदान करतील, असे दिसत नाही. ही बाब लक्षात घेता पॅनेलमधील काही उमेदवारांनी स्वतंत्र प्रचारदेखील सुरू केला आहे. मतांचा जोगवा मागितला जात आहे. आपल्या जातीला पुढे करा, असे भावनिक आवाहन उमेदवार करीत आहेत. यामुळे निवडणूक रंगतदार होईल, असे दिसत आहे.

या वेळेस तुल्यबळ लढत शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण व आघाडीचे उमेदवार पांडुरंग पाटील (राजू) यांच्यात होईल, असे दिसत आहे. दोन्ही कुणबी पाटील किंवा मराठा समाजातील असल्याने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस पायपीट सुरू आहे.

सेवा सहकारी संस्था मतदार संघात भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदार संघात वसंत भालेराव, समाधान धनगर व आघाडीचे नीलेश पाटील यांच्यात लढत आहे. भालेराव हे पालकमंत्री गुलाबराव यांचे समर्थक आहेत. परंतु भालेराव यांना भाजपमुळे उमेदवारी मिळाली नाही, अशी चर्चा आहे.

यातच भालेराव यांनी निवडून येण्याची क्षमता असल्याचा दावा करीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच युतीचे अनिल भोळे व आघाडीचे मनोज चौधरी, युतीचे प्रभाकर सोनवणे व आघाडीचे श्यामकांत सोनवणे यांच्याबाबत काय निकाल येतो, याबाबतही उत्सुकता आहे.

प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही उमेदवार रोज किमान १० गावांमध्ये स्वतंत्र जावूऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच सायंकाळी व रात्रीदेखील मतदारांकडे पोहोचून उमेदवार संपर्क साधून मते मागत आहेत. उमेदवार जातीय समीकरणे लक्षात घेऊन आपापल्या जातबंधू उमेदवारांशी संपर्क करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com