श्रावणात साखरेला मागणी वाढण्याची केंद्राला आशा

जुलै महिन्यामध्ये साखरेची मागणी (Sugar Demand) मध्यम स्वरूपाची राहिली. येणाऱ्या ऑगस्टमध्ये श्रावणामुळे सर्वत्र सणासुदीची धामधूम आहे. यामुळे गोड पदार्थांना मागणी वाढणार आहे.
Sugar
Sugar Agrowon

कोल्हापूर : श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांचा विचार करून केंद्राने देशातील सर्व साखर कारखान्यांना (Sugar Mills) ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख टन देशांतर्गत साखर विक्रीचा (Sugar Sell) कोटा दिला आहे.

गेल्या महिन्यात २१.४४ लाख टन साखरेचा कोटा दिला होता. या महिन्यात त्यात ५० हजारांची भर घातली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत एक लाख टनाने या वर्षी कोटा वाढवून दिला आहे.

Sugar
sugar exports: केंद्राकडून लवकरच अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरी?

जुलै महिन्यामध्ये साखरेची मागणी (Sugar Demand) मध्यम स्वरूपाची राहिली. येणाऱ्या ऑगस्टमध्ये श्रावणामुळे सर्वत्र सणासुदीची धामधूम आहे. यामुळे गोड पदार्थांना मागणी वाढणार आहे. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी केंद्राने कुठेही निर्बंधाबाबत भाष्य न केल्याने हे सर्व सण मुक्त वातावरणात साजरे होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक वर्षी प्रमाणे श्रावणामध्ये साखरेची मागणी चांगली राहील, अशी आशा केंद्राला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये २१ लाख टनांचा साखर कोटा दिला होता. दिलेली साखर विक्री करतानाही कारखान्याच्या नाकी नऊ आले होते. यंदा मात्र परिस्थितीत बदल झाला आहे. गेल्या सहा महिन्यापासून बहुतांशी सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. याचा फायदा साखर विक्रीला होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात साखरेला मध्यम मागणी असली तरी बहुतांशी कारखान्यांनी आपली कोट्याइतकी साखर विकली आहे.

Sugar
wheat silos: चार राज्यांत गहू साठवणुकीसाठी सायलोची उभारणी

साखरेच्या दरात वाढ

सणासुदीमुळे साखरेला मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दरात ही वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे. क्विंटलला १०० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढू शकतील, अशी शक्यता आहे. गेल्या महिन्यात अनेक साखर कारखान्यांनी ३२०० येते ३३०० रुपयांपर्यंत साखर विक्री केली. सणासुदीमुळे पुन्हा दर वाढण्याची शक्यता असून, ३५०० रुपयांजवळ साखरेचे दर जात आहेत, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

निर्यात नोटिफिकेशनची प्रतीक्षा

केंद्राने चार दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत १२ लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही याबाबतच्या सूचना कारखान्यांना केंद्राने दिलेल्या नाहीत. किंवा तशी घोषणा ही अद्याप केलेली नाही. हा निर्णय अजूनही अधिकारी पातळीवरच प्रलंबित आहे. येत्या काही दिवसांत कारखान्यांना निर्यातीच्या सूचना प्राप्त होतील, असे केंद्रीय सूत्रानी सांगितले.

Sugar
‘Kisan rail: 'किसान रेल्वे`ची महाराष्ट्रात घोडदौड

बंदरावरून धीम्या गतीने साखर निर्यात

केंद्र सरकार तातडीने निर्यातीला परवानगी देत नसल्याने याचा फटका निर्यातीला बसला आहे. देशातील बहुतांशी बंदरावरून धीम्या गतीने निर्यात सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साखरनिर्यात अडथळ्याची ठरत असली, तरी थोड्या थोड्या प्रमाणात साखर निर्यात (Sugar Export) सुरू असल्याची माहिती जयगडच्या आंग्रे बंदराचे व्यवस्थापक विशाल दिघे यांनी दिली. केंद्राने तातडीने नोटिफिकेशन काढून निर्यातीला चालना दिल्यास पावसाळा तीव्र होण्यापूर्वी बंदरावरील हालचाली वाढण्याची शक्यता आहे. सध्या साखर कारखानदार, निर्यातदार तसेच बंदराचे पदाधिकारीही केंद्राच्या नोटिफिकेशन कडे लक्ष ठेवून आहेत.

३० जुलैचे स्थानिक बाजारातील साखरेचे दर असे.

आकारानुसार, प्रतिक्विंटल रुपयेमध्ये (किमान-कमाल)

राज्य---एस ३०---एम ३०

महाराष्ट्र---३३१०-३३९०---३४१०- ३४८०

कर्नाटक---३३६०-३४४०---३४१०-३४८०

उत्तर प्रदेश - ३५२०- ३६१०

गुजरात---३३१५- ३३५५---३३७५- ३४५०

तमिळनाडू---३४५०- ३५००---३५००- ३५५०

मध्य प्रदेश---३४५०-३४९०---३४९०- ३५१०

पंजाब - ३५५०- ३६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com