Harbhara MSP : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्रे वाढविणार

यंदा कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल ५० किलो आणि हिंगोलीसाठी १२ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
Gram MSP
Gram MSPAgrowon

Parbhani News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (MSP Scheme) यंदाच्या रब्बी हंगामातील (२०२२-२३) हरभऱ्याची हमीभावाने (MSP) (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) खरेदी केली जाणार आहे.

त्यासाठी यंदा परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल ५० किलो आणि हिंगोलीसाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

सुव्यवस्थेसाठी ‘नाफेड’च्या (Nafed) वतीने राज्य सहकारी पणन महासंघ (State Co-operative Marketing Federation) आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या (व्हीसीएफ) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

Gram MSP
Chana MSP Procurement : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता जाहीर

दरम्यान, निश्चित केलेल्या केंद्रांवर हरभरा विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून (ता. २७) सुरुवात झाली. प्रस्तावित केंद्रांच्या मंजुरीनंतर अंतिम संख्या निश्चित झाल्यास ऑनलाईन नोंदणी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी (२०२१ -२२) हमीभावाने हरभरा खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता ८ क्विंटल २० किलो तर हिंगोली जिल्ह्यसाठी ११ क्विंटल होती.

यंदा कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल ५० किलो आणि हिंगोलीसाठी १२ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणीत परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ठिकाणची केंद्रे निश्चित आहेत. प्रस्तावित केंद्रांमध्ये पेडगाव, पोखर्णी (ता. परभणी), बामणी (ता. जिंतूर), वालूर (ता. सेलू) या चार ठिकाणांचा समावेश आहे.

Gram MSP
MSP Procurement : हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

हिंगोलीत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ठिकाणची केंद्रे निश्चित आहेत. तर येळेगाव आणि चोंडी या दोन ठिकाणी केंद्रे प्रस्तावित आहेत, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.

विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खरेदी केंद्र आहे. हिंगोलीतही केंद्र प्रस्तावित आहेत, असे ‘व्हीसीएफ’चे जिल्हा व्यवस्थाक भागवत सोळंके यांनी सांगितले.

नोंदणीसाठी सोबत ही कागदपत्रे आणा

शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यांतील केंद्रांच्या ठिकाणी नोंदणीकरिता सोबत रब्बी हंगाम २०२२-२३ मधील हरभरा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आणावे व बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खात किंवा पतसंस्थेतील खाते क्रं देऊ नये.) संबंधित केंद्राच्या ठिकाणी हमीभावाने हरभरा विक्रीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com