Solapur District Administration : ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत एका दिवसात दाखला

District Administration : एका दिवसात दाखला देण्यासाठी १२ काउंटर लावण्यात येतील. या १२ काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्स कार्यरत असतील.
Solapur News
Solapur NewsAgrowon

Solapur News : दहावी आणि बारावीच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व क्रिमीलेअर प्रमाणपत्र मागणीसाठी नागरिकांची होणारी गर्दी व त्यांना वेळेमध्ये प्रमाणपत्रे देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेतंर्गत एका दिवसात दाखले देण्यासाठी खास शिबिर आयोजिले आहे. उद्या गुरुवारपासून (ता.१८) हे शिबिर सुरु होत आहे.

आगामी जून महिन्यामध्ये दहावी आणि बारावी प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले नागरिकांना सुलभपणे आणि वेळेमध्ये मिळावेत व शाळा कॉलेजमधील प्रवेशांमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत, याकरिता सोलापूर शहरातील नागरिकांकरिता उत्तर सोलापूर तहसीलदार यांच्यामार्फत शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Solapur News
Gram Panchayat Administration : महाडमध्ये रिक्त पदांमुळे गावगाडा संथ

एका दिवसात दाखला देण्यासाठी १२ काउंटर लावण्यात येतील. या १२ काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्स कार्यरत असतील.

त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील चार नायब तहसीलदार, चार अव्वल कारकून, पाच सर्कल अधिकारी, पाच लिपिक, सहा तलाठी, दहा कोतवाल व चार ऑपरेटर अशी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आठवडाभर मध्यवर्ती ठिकाणी ही सेवा दिली जाईल.

या सर्व कामावर उत्तर सोलापूरचे तहसीलदार हे स्वतः लक्ष ठेवतील. नागरिकांना दाखल्यांच्या अनुषंगाने असणाऱ्या सुविधा वेळेत मिळतील, याबाबत आवश्यक ती दक्षता ते घेतील.

ज्या महा-ई-सेवा केंद्राकडून शासनाने विहित केलेल्या शुल्का पेक्षा अधिक पैशांची मागणी केली जाईल, अशा महा-ई-सेवा केंद्रांची वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती घेऊन त्याची पडताळणी करून आवश्यकता भासल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com