Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पवार

बँकेत दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर ठरल्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामे दिले होते.
District bank
District bankAgrowon

District bank : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Jalgaon District Bank) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली.

यात काँग्रेस व शिवसेनेच्या (शिंदे गट) पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

शनिवारी (ता.११ ) अध्यक्षपदाची निवड होती. बँकेत दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर ठरल्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामे दिले होते.

त्यानुसार शनिवारी अध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव नेत्यांनी निश्चित केले. त्याची माहिती आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

District bank
KDCC District Bank : ‘केडीसीसी’चा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव

मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्षपदासाठी बंडखोरी झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार यांनीही अर्ज दाखल केला. त्यात पवार यांना काँग्रेसचे संचालक व शिवसेनेने पाठिंबा दिला.

पवार यांना ११ तर रवींद्र पाटील यांना १० मते मिळाली व त्यांची निवड अध्यक्षपदी झाली. तसेच उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अमोल पाटील हे शिवसेनेचे एरंडोल विधानसभा मतदार संघातील आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र आहेत.

पवार गुलाबराव यांचे निकटवर्तीय

संजय पवार हे शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही पवार यांनी एकनाथ खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस प्रणीत पॅनलविरोधात जाऊन मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढविली होती.

District bank
Banking Loan : मालमत्ता जप्तीच्या जिल्हा बँकेकडून नोटिसा

त्यावेळी पवार यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले होते. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही पवार यांनी बंडखोरी केली व ते अध्यक्षपदी निवडून आले.

पवार यांच्यावर पक्षनेते, वरिष्ठ कारवाई करतील, असे जिल्हा बँकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com