Irrigation Projects : अकोला जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणी असूनही शेतीसाठी उपयोग नाही

सिंचन क्षेत्र वाढले तर उत्पादकता वाढून पर्यायाने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. यासाठी सिंचनाच्या सुविधांची सातत्याने गरज व्यक्त होते.
Irrigation Projects
Irrigation ProjectsAgrowon

Akola Irrigation projects News : गेल्या काही वर्षांत चांगला पाऊस (Rain) होत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरत आहेत. रब्बी, उन्हाळी लागवड (Summer Sowing) क्षेत्रात वाढ होत असताना प्रकल्पाधारित सिंचनाच्या (Irrigation) मार्गात अनेक अडचणी तयार झालेल्या असल्याने लक्ष्यांक साध्य होताना दिसत नाही.

एकीकडे जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र (Dry Land Agriculture) अधिक असल्याने उत्पादकतेला मर्यादा सांगितल्या जातात. तर दुसरीकडे पाणी उपलब्ध असतानाही यंत्रणांना सिंचन क्षेत्र वाढवताना मर्यादा येत आहेत. प्रामुख्याने निधी, जुने झालेले कालवे, सिंचन वसुलीचे मुद्दे अडसर बनले आहेत.

सिंचन क्षेत्र वाढले तर उत्पादकता वाढून पर्यायाने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. यासाठी सिंचनाच्या सुविधांची सातत्याने गरज व्यक्त होते. आता परिस्थिती नेमकी बदलली आहे. सिंचनासाठी पाणी आहे, परंतु ते पाणी शेती व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविताना अनेक अडथळे येत आहेत.

प्रामुख्याने मागील दोन-तीन वर्षांत शासनाकडून मिळणारा निधीच आटला आहे. यामुळे कालवे दुरुस्तीसारखा महत्त्वाचा विषय हाताळणे अशक्य झालेले आहे.

Irrigation Projects
Irrigation Subsidy : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी परवड

आज कालव्यांची दुरवस्था झाल्याने पाणी व्यवस्थित पोहोचवता येत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांना ५० वर्षे लोटली आहेत. तेव्हा तयार केलेल्या पाणी वाटपाच्या सुविधा आता कालबाह्य ठरत आहेत. कालव्यांची क्षमता कमी झाली. लघू प्रकल्पांचे कालवे कमी होत गेले.

पाटसऱ्या नष्ट झाल्या. काहींनी प्रकल्प क्षेत्रात विहिरी खोदत स्वतःची व्यवस्था करून घेतली. पाणी वापर संस्थांना सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सिंचन वसुलीसारखे महत्त्वाचे काम, पाण्याचे व्यवस्थापन अपेक्षित आहे.

शासनाने प्रकल्पाच्या क्षेत्रातून सिंचन वसुली करून कामे करण्याची सूचना केलेली आहे. पाणीपट्टी वसुलीवर आधारित निधी वितरणाची भूमिका घेण्यात आलेली आहे. शिवाय अत्यावश्‍यक कामांसाठीसुद्धा आता निधी दिला जात नाही.

प्रशासकीय यंत्रणा संख्येने कमी झाली. अशा विविध बाबींमुळे आता प्रकल्पाधारीत सिंचनाच्या मार्गात अडथळे तयार झालेले आहेत.

Irrigation Projects
Irrigation Department : ‘क्यूआर’ कोडद्वारे होणार पाणीपट्टी वसुली

अकोला पाटबंधारे विभागाचे सिंचन साध्य

झालेले सिंचन - १५०४२ हेक्टर

वान प्रकल्प - ४०३७ हेक्टर

काटेपूर्णा- ४७०३ हेक्टर

मोर्णा- १००७ हेक्टर

निर्गुणा - ९२१ हेक्टर

विश्‍वमित्री - ७९२ हेक्टर

उमा - ८६७ हेक्टर

दगडपारवा - ४१९ हेक्टर

उपसा सिंचनावर सध्या जोर दिला जात आहे. सिंचनाची साधने बदलली असताना शासनाच्या धोरणात कवडीचाही बदल झालेला दिसत नाही. वास्तविक नवीन सिंचन साधनामुळे पाण्याची उत्पादकता वाढवू शकते. मुख्य कालवा ते उपकालव्यापर्यंत वीज पुरवठ्याची आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. अशी सुविधा झाली तर उपसा सिंचन वाढवता येईल. या वर्षी काटेपूर्णाच्या क्षेत्रात उपसा सिंचन करून दरवर्षीच्या तुलनेत क्षेत्र वाढवण्यात यश आले आहे.
मनोज तायडे, प्रकल्प समिती अध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com