Chana Procurement : अमरावतीत मोबाईल केंद्राद्वारे हरभरा खरेदी

‘नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ने हरभरा विपणनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत थेट शेतकऱ्यांच्या दारावरच खरेदीचा अभिनव पॅटर्न राबविला आहे.
Chana Procurement
Chana ProcurementAgrowon

Amravati News : ‘नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ (Nobel Pulse Food Growers Co-operative Society) ने हरभरा विपणनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत थेट शेतकऱ्यांच्या दारावरच खरेदीचा अभिनव पॅटर्न राबविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराच भार हलका झाला आहे.

‘नाफेड’च्या केंद्रांवर शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागते. यातच त्यांचा वेळ, श्रम आणि पैसाही खर्ची होतो. त्यामुळे ‘नोबेल’ने शेतकऱ्यांच्या दारावर जात हरभरा खरेदीचा निर्णय घेतला. दर्यापूर तालुक्‍यात सात केंद्रांतून ही खरेदी होत आहे.

Chana Procurement
Chana Procurement : हजारो शेतकऱ्यांचा हरभरा पडून

रामागढ, नरदोडा, हिंगणी, शिवर, पिंपळद, वरुड, दर्यापूर या गावांमध्ये २३०० क्‍विंटल हरभरा खरेदी केला. संस्थेचे संजय आसरे, संदीप लाजूरकर हा उपक्रम राबवित आहेत.

शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने थेट त्यांच्या दारावरूनच खरेदीचा निर्णय घेतला. याला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर सुमारे २३०० क्‍विंटल हरभरा खरेदी केला.
अरविंद नळकाडे, अध्यक्ष, नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी, धामोडी.
हमीभाव केंद्रांवर नोंदणी करून हरभरा विक्री केली असता त्यात वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होतो. मात्र या संस्थेने थेट दारावर येत हरभरा खरेदी केला. हा सुखद अनुभव होता.
प्रल्हादराव काळे, शेतकरी, दर्यापूर, अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com