Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

मॉन्सूनचा (Monsoon) आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक सर्वसामान्य स्थितीच्या काहीसे उत्तरेकडे असून, पूर्वेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सरकले आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon

पुणे : मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. यातच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यातही वाढ झाली आहे. काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा (Monsoon) आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक सर्वसामान्य स्थितीच्या काहीसे उत्तरेकडे असून, पूर्वेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सरकले आहे. छत्तीसगडपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, दिवसभर असणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे कमाल तापमानासह उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नंदूरबार जिल्ह्यातील अक्रणी येथे सर्वाधिक ८२ मिलिमीटर, तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

राज्यात रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : कागल ३०.

नंदूरबार : अक्रणी ८२,

पुणे : बारामती २१.

सोलापूर : माळशिरस ३२.

मराठवाडा :

औरंगाबाद : पैठण ४८.

बीड : पाटोदा ३९.

लातूर : रेणापूर ६५.

नांदेड : हदगाव ३३.

उस्मानाबाद : कळंब २२, उमरगा ३३.

परभणी : मानवत २७, पाथरी ४१.

विदर्भ :

अकोला : बार्शीटाकळी २८.

चंद्रपूर : जेवती ३४.

वाशीम : मानोरा २३.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com