Sugarcane Production : यंदाच्या हंगामात उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याच्यी शक्यता

गेल्या चार वर्षापासून कृष्णा आणि वारणा नदीच्या काठच्या परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदाच्या ऊस लागवडीचा (Sugarcane Cultivation) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ९० हजार ५५५ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. अजूनही तासगाव, खानापूर या दोन तालुक्यातील पूर्व, सुरु आणि खोडवा उसाच्या क्षेत्राचा अहवाल तालुका कृषी विभागाने (Agriculture Department) वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला नसल्याचे चित्र आहे.

अर्थात यंदाच्या हंगामात देखील जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टरच्या जवळपास पोहचेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून कृष्णा आणि वारणा नदीच्या काठच्या परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्याच बरोबर ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या भागातही बागायती क्षेत्र वाढत आहे.

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यात ऊस क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. जिल्‍ह्यातील पूर्व आणि सुरु हंगामातील लागवड आटोपली आहे.

Sugarcane
Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप हंगाम पूर्णत्वाकडे

गेल्या वर्षी आणि यंदाच्या हंगामात आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखाने बंद होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस लागवड कमी होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता.

परंतु जिल्ह्यासह कर्नाटक सीमेवरील साखर कारखान्यांनी काटेकोर नियोजन करत या भागातील ऊस गाळपास नेला. यामुळे गतवर्षी आणि यंदाही या भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी पुढे आले असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात आडसालीचे ४२ हजार ८४० हेक्टर, पूर्व हंगाम १७ हजार ५७४, सुरुचे ८ हजार ४८१ आणि खोडव्याचे २१ हजार ६६१ हेक्टर इतक्या क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील तालुका कृषी विभागाने ऊस नोंद केलेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.

मात्र, तासगाव आणि खानापूर या दोन तालुक्यातील तालुका कृषी विभागाने अद्यापही ऊस नोंद असलेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील अहवाल आल्यावर जिल्ह्यात किती क्षेत्र वाढेल याचा अंदाज येईल.

Sugarcane
Sugarcane FRP : साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ८१३ कोटी थकित

तालुकानिहाय ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका - क्षेत्र

मिरज - ८०१२

जत - ८७६७

खानापूर - २८३०

वाळवा - २४६५१

तासगाव - २७२५

शिराळा- १०२२०

आटपाडी - २२७४

कवठेमहांकाळ -४२६०

पलूस - १३६०७

कडेगाव - १३२०५

एकूण- ९०५५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com