Solapur Zilha Parishad : ‘कचरामुक्त ग्राम’साठी लोकांचे मन परिवर्तन करा

Solapur Zilha Parishad Update : कचरामुक्तीचे जिल्ह्यात दूरगामी परिणाम होतील. कचरामुक्त ग्राम अभियानासाठी लोकांचे मनपरिवर्तन करा.
Solapur Zilha Parishad Staff
Solapur Zilha Parishad StaffAgrowon

Solapur ZP News : ‘‘कचरामुक्तीचे जिल्ह्यात दूरगामी परिणाम होतील. कचरामुक्त ग्राम अभियानासाठी लोकांचे मनपरिवर्तन करा’’, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कचरामुक्त ग्राम अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी स्वामी बोलत होते. जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी महेश पाटील, पशुसंवर्धन अधिकारी पी. व्ही. देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

Solapur Zilha Parishad Staff
Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेत मार्च एन्डची लगबग

स्वामी म्हणाले, ‘‘लोकांमध्ये कचऱ्याबद्दल अज्ञान आहे, हे माझे काम आहे का? असे मनात ठेवू नका. आधी मनातील कचरा दूर करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रत्येक गाव हे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले आहे. कचरामुक्त गाव अभियान ही संकल्पना आहे. लोकांचे मनपरिवर्तन करा. मनातील जळमटे काढून टाका. आपणास कोण विचारणार हे मनात ठेवू नका.’’

‘अंगणवाडीत प्राथमिक शिक्षक शिकविणार’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक एक तास शिकविणार आहेत.

त्यासाठी लवकरच आदेश काढणार आहोत. अंगणवाडीतील मुले प्राथमिक शाळेत येतील, त्यासाठी त्यांचा पायी आधीच पक्का होईल, असा प्रयत्न आहे, असेही स्वामी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com