मुळशीच्या नवीन प्रारूप आराखड्याच्या रचनेत बदल

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नुकताच प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. प्रारूप आराखड्यानुसार मुळशीत जिल्हा परिषदेचा एक गट, तर पंचायत समितीच्या दोन गणांची वाढ झाली आहे.
मुळशीच्या नवीन प्रारूप आराखड्याच्या रचनेत बदल
Pune ZPAgrowon

पुणे : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी (Election) नुकताच प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. प्रारूप आराखड्यानुसार मुळशीत जिल्हा परिषदेचा (Zila Parishad) एक गट, तर पंचायत समितीच्या दोन गणांची वाढ झाली आहे. नवीन प्रारूप आराखड्यामुळे गण व गटांच्या प्रारूप रचनेतही बदल झालेला आहे.

मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट, तर पंचायत समितीचे सहा गण होते. नवीन रचनेनुसार मुळशीत एक जिल्हा परिषद गट वाढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी आता जिल्हा परिषदेचे चार गट, तर पंचायत समितीसाठी आठ गण असणार आहे. नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप तीन आराखड्यांवर नागरिकांना हरकती घेता येणार असून बुधवारपर्यंत (ता. ८ जून) त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्या लागणार आहेत.

नव्या प्रारूप रचनेनुसार पंचायत समितीचे माले, कोळवण, हिंजवडी, कासारसाई, माण, कासार अंबोली, पिरंगुट, भूगाव असे आठ गण पडले आहेत. पिरंगुट गण सर्वात छोटा म्हणजे अडीच गावांचा झाला आहे. तर, हिंजवडी गणातही केवळ तीन गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसाठी माले कोळवण (गट क्रमांक ३८), हिंजवडी कासारसाई (गट क्रमांक ३९), माणकासारआंबोली (गट क्रमांक ४०) आणि पिरंगुट भूगाव (गट क्रमांक ४१) असे चार गट तयार झाले आहेत.

गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे :

गण --- समाविष्ट गावे

माले गण क्रमांक ७५ -- आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, चांदिवली, शेडाणी, वळणे, संभवे, भादस, असदे, अकोले, शेरे, जामगाव, माले, मुळशी खुर्द, वारक, ताम्हिणी, निवे, वडगाव, वांद्रे, भांबर्डे, बापे, आंदेशे, मांदेडे.

कोळवण गण क्रमांक ७६ -- चिंचवड, बेलावडे, खेचरे, कोंढावळे, रावडे, खुबवली, मुगावडे, दखणे, कुळे, चिखलगाव, चाले, नाणेगाव, नांदगाव, साठेसाई, कोळवण, मालगुडी, काशिंग हाडशी, वाळेण

कासारसाई गण क्रमांक ७७ --- कासारसाई, नेरे, घोटावडे, रिहे, पिंपळोली, जवळ, खांबोली, कातरखडक,

हिंजवडी गण क्रमांक ७८---- मारुंजी, हिंजवडी, जांबे

माण गण क्रमांक ७९ --- माण, नांदे, चांदे, मुलखेड, लवळे,

कासार आंबोली गण क्रमांक ८० --- कासारआंबोली, अंबडवेट, भरे, दारवली, पौड, उरवडे, मारणेवाडी, आंबेगाव,

पिरंगुट गण क्रमांक ८१ ---- बोतरवाडी, आंदगाव, मुठा, खारावडे, कोळावडे, लव्हार्डे, वेगरे, टेमघर, भोंडे, वातुडे, वांजळे, माळेगाव, जातेडे, कोंढूर, डावजे, भोसे खुर्द, तव, धामण ओहोळ, मुगाव, भोईणी, दासवे, आडमाळ, पाथरशेत आणि पिरंगुट ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन

भूगाव गण क्रमांक ८२ --- भुकूम, भूगाव आणि पिरंगुट ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा.

पिरंगुट गावाचे दोन गणांत विभाजन

नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप आराखड्यानुसार मुळशीची औद्योगिक राजधानी असलेल्या पिरंगुट गावचे दोन गणांत विभाजन झाले. त्यानुसार पिरंगुट ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीनचा समावेश पिरंगुट गणात झाला आहे. तर, प्रभाग क्रमांक चार, पाच आणि सहाचा सहभाग भूगाव गणात झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com