सावध निवडा नव्या वाटा

फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पूरक असा जोडधंदा असावा. ज्यामुळे शेतीत तोटा झाला तर सहज भरून निघेल.
सावध निवडा नव्या वाटा

शंकर बहिरट

फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पूरक असा जोडधंदा असावा. ज्यामुळे शेतीत तोटा झाला तर सहज भरून निघेल. बहुतेक तरुण शेतकरी शेतीला पूरक असा जोडधंदा यशस्वीपणे करीत आहेत. काही तरुण सतत काही नावीन्यपूर्ण उद्योग करायची स्वप्ने बघत असतात. प्रगतीच्या नव्या वाटा चोखाळणे म्हणजे ध्येयाने प्रेरित होऊन केलेली क्रांती असते. प्रवाहाबरोबर पोहण्यापेक्षा प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा असामान्य व्यक्ती म्हणून गणला जातो. रुळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःची नवी वाट शोधणारे आणि त्या वाटेवरून इतरांना घेऊन जाणारे समाजासाठी आदर्श ठरतात. मात्र प्रत्येक नवी वाट ही सुखकर असेलच असे नाही.

सावध निवडा नव्या वाटा
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

मोठे यश मिळवून देणारी वाट काट्याकुट्यांनी भरलेली असते. त्या वाटेने जायचे म्हणजे तितकेच जोखमीचे असते. ही जोखीम स्वीकारायला एकट्याने समर्थ असावे लागते.

नवी वाट असल्याने काळजीपोटी घरच्यांकडूनही विरोध होत असतो. नव्या धंद्यात भांडवल न गुंतवता किंवा हात उसने घेऊन कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल याचा शोध चालू असतो. वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातीत कमी भांडवलात घरबसल्या लाखो कमवा. अशा अनेक प्रकारच्या जाहिराती असतात. नव्याचा शोध घेणारे तरुण अशा फसव्या जाहिरातींना बळी पडतात. ‘जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्यास वर्तमानपत्र जबाबदार नाही’ अशी या जाहिरातींच्या पानावर शेवटी टीप दिलेली असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून फसवणूक करणाऱ्या जाहिरातींच्या जाळ्यात तरुण वर्ग ओढला जातो.

कोणतीही नवी वाट किंवा नवी संकल्पना फसवी किंवा वाईट नसते. मात्र, जगाच्या बाजारात अनेक संधिसाधू, स्वार्थी, लबाड लोक नवख्या तरुणांना फसवायला टपून बसलेले असतात. खोटी प्रलोभने दाखवून प्रशिक्षण आणि कच्चा माल इ. साठी वारेमाप पैसे उकळले जातात. तयार माल विकत घेण्याची हमी देणारे ऐनवेळी पोबारा करतात आणि शेवटी पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. धंद्यासाठी सखोल अभ्यास, योग्य नियोजन, अविरत मेहनत, सातत्य, सहनशीलता, व्यवहार कुशलता इ. गुण असावे लागतात. जाहिराती मधल्या ‘लाखो कमवा’ या प्रलोभन दाखवणाऱ्या दोन शब्दांना जागरूक, अभ्यासू तरुण बळी पडत नाहीत. नव्या वाटेने जाताना स्वतःला इतके सावध आणि सक्षम बनवा की तुमची कधीही फसवणूक होणार नाही. नव्या दिशेने झेप घ्यायची म्हणजे आपल्या पंखात बळ हवे नजर सभोवार आणि तेज हवी. तरच उंच आकाशात भरारी घेता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com