नागरिक करणार झेडपीच्या कामाचे मूल्यमापन

‘माझी झेडपी माझा अधिकार’ अभियान
नागरिक करणार झेडपीच्या कामाचे मूल्यमापन
Pune ZPAgrowon

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) कामकाजाचे सामाजिक मूल्यमापन केले जाणार आहे. यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली असून, ‘माझी झेडपी माझा अधिकार’ (My ZP My Right) हे अभियान सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणार आहे. या संगणकप्रणालीचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते नुकतेच झाले.

याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ते म्हणाले, ‘कोणताही नागरिक पुणे झेडपीच्या वेबसाइटच्या महालाभार्थी भागावर लॉगइन करू शकतो आणि टॅबवर क्लिक करू शकतो. ‘माझी झेडपी माझा अधिकार’ यावर जाऊन जिल्हा परिषदेने राबवलेली गावनिहाय कामे आणि योजना पाहू शकतो. त्यावर तो स्वतःचा अभिप्राय लिहून कामाबद्दल मत व्यक्त करू शकणार आहे. या नोंदी छायाचित्रासह अभिप्रायांची नोंद करून त्याचे स्वतः मूल्यमापन करू शकणार आहेत. नागरिकांचा अभिप्राय आणि मूल्यमापनाचे मूल्यमापन जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार आहे. याद्वारे झालेल्या कामांबाबत नागरिक समाधानी आहेत का? याचे मूल्यमापन होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com