मनाची सफाई

आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे. प्रत्येक सणामागे एक वेगळे वैशिष्ट्य असते. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे सणही आपण वर्षभर साजरे करतो.
मनाची सफाई

ज्योती आधाट/तुपे

आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे. प्रत्येक सणामागे एक वेगळे वैशिष्ट्य असते. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे सणही आपण वर्षभर साजरे करतो. त्यातीलच एक नवरात्रोत्सव हा सण. शक्तीची पूजा आपण करतोच पण त्यासोबत नैसर्गिक संवर्धनाचा संदेशही घट बसवण्यामागचा एक उद्देश आहे.

मनाची सफाई
Cotton : चीनच्या स्वस्त सुताची कापूस उत्पादकांना धास्ती?

शेतातील धनधान्य म्हणजे समृद्धीचे प्रतीक असते आणि या नऊ दिवसांत शेतीचे एक प्रतीक आदिशक्तीपुढे बहरून येते. नवरात्रोत्सव चैत्र आणि आश्‍विन महिन्यांमध्ये श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा कालावधी आपल्या मूळ स्रोतांकडे परतण्याचा आणि स्वतःच्या प्रगतीचा असतो. कारण निसर्ग देखील या कालावधीमध्ये जुनी मरगळ टाकून नवीन पालवी धारण करत असतो.

दसरा, दिवाळी तसेच इतर सण येण्यापूर्वी आपण घराची स्वच्छता करतो. पण मनाच्या स्वच्छतेचे काय? मनातलं नैराश्य, नकारात्मकता घालवण्यासाठी आपण प्रत्येकाने या दिवसात स्वतःसाठी थोडा वेळ काढणं फार गरजेचं आहे. देवीची आराधना म्हणजे सकारात्कतेचा नकारात्मकतेवर मिळवलेला विजयच जणू...

मनाची सफाई
Soybean Verity : पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

कारण हे वातावरण मनाला चैतन्य देणारं असतं. आपल्या मनाला ज्या गोष्टींमुळे शांत वाटेल. आनंद वाटेल त्या आपण कराव्यात. ध्यानसाधना मन स्वच्छ करण्याचा एक छानसा मार्ग आहे. जसं शक्य होईल तसं आपण १०-१५ मिनिटे शांत डोळे मिटून बसावं. ही १५ मिनिटे आपल्याला दिवसभराची शक्ती देऊन जातात.

निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्यानेही मन खूप शांत होतं. निसर्गातील शक्ती मनाला तंदुरुस्त करणारी असते. निसर्गातला एक फेरफटका रिफ्रेश करतो आपल्याला. पण आपण मात्र घर, घरातली कामे नोकरी-व्यवसायाची कामे यात इतकं गुरफटतो, की स्वतःचा जणू विसरच पडतो आपल्याला!

अशावेळी आनंद आपल्यापासून कोसो दूर असतो. यामुळे जास्त काही फरक पडत नाही. पण आपली चिडचिड वाढते. त्याच त्या रूटीन वर्कमुळे मनात कल्पक विचार येण्याचे थांबतात. मनाला कुठंतरी निवांतपणा हवा असतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दररोज घराची सफाई करतो तशीच जर मनाची सफाई केली तर किती छान होईल. आनंदाला उधाण येईल.

जगण्याची गती इतकी वाढेल, की प्रत्येक क्षण उत्सवासारखा आपण साजरा करू. क्षमा, कृतज्ञता यामुळेही मन साफ होतं. कुणी आपल्याशी वाईट वागलं, विचार न करता क्षमा करून टाकुयात. आपल्याला कुणी मदत केली, चांगलं वागलं की ऋण व्यक्त करूयात. कृतज्ञ राहूयात. यामुळे आपोआप मन साफ होऊन छान आरोग्य राहण्यासाठी मदत होईल. मग ध्यानसाधनेची सुरुवात करुयात आजपासून... आतापासून...!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com