भातपिकाच्या हंगामात पंजाबला हवा आहे सलग वीजपुरवठा

देशाच्या धान्य उत्पादनातील पंजाबचे योगदान लक्षात घेत केंद्र सरकारने पंजाबची सलग विजपुरवठ्याची मागणी मान्य करावी, असा आग्रह मान यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री सिंग यांच्याकडे धरला.
Uninterrupted Power
Uninterrupted PowerAgrowon

भातपिकाच्या हंगामात पंजाबला सलग, अखंडितपणे वीजपुरवठा करण्यात यावा, असा आग्रह राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी केंद्र सरकारकडे धरला आहे.

भगवंत मान यांनी सोमवारी (दिनांक २५ एप्रिल) केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग (R. K. Singh) यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री मान यांनी राज्यातील वीजटंचाईचा प्रश्न उपस्थित करत काही मागण्या सिंग यांच्याकडे केल्या आहेत.

Uninterrupted Power
महाराष्ट्रातले शेतकरी का जाताहेत तेलंगणात ?

राज्याला भातपीक (Paddy Cultivation) लागवडीच्या काळात सलग वीजपुरवठ्याची गरज आहे. देशाची खाद्य गरज भागविण्यात पंजाबने नेहमीच मोठे योगदान दिले आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात अग्रेसर असलेल्या पंजाबचे देशाच्या एकूण धान्य उत्पादनातील योगदान लक्षात घ्यावे, असे आवाहन करत मान यांनी आपली सलग वीजपुरवठ्याची मागणी केंद्रीय मंत्र्यांसमोर ठेवली आहे.

देशाच्या खाद्यान्न सुरक्षेतील राज्याच्या योगदानाचा विचार करून भातपिकाच्या हंगामात सलग वीजपुरवठा करण्यात यावा. केंद्र सरकारच्या आवाहनानुसार पंजाब सरकार आता गहू (Wheat) आणि तांदळाखेरीज (Rice) अन्य पिकांच्या उत्पादनावर भर देणार असल्याचे मान यांनी सिंग यांना सांगितले.

Uninterrupted Power
यापुढे श्रीमंत शेतकऱ्यांना वीजदरात सवलत नाही ?

राज्यातील शेतकऱ्यांना गहू आणि भातपिकाच्या लागवडीऐवजी हरभरा,मक्यासोबतच अन्य पिकांच्या लागवडीकडे वळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे मान म्हणाले.

शेतकऱ्यांनी फलोत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, यासाठीही राज्याच्या कृषी व फलोत्पादन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. इतर पिकांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष सवलतीही देण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, त्यासाठी थोडा कालावधी लागेल, असेही मान यांनी नमूद केले आहे.

देशाच्या धान्य उत्पादनातील पंजाबचे योगदान लक्षात घेत केंद्र सरकारने पंजाबची सलग विजपुरवठ्याची मागणी मान्य करावी, असा आग्रह मान यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री सिंग यांच्याकडे धरला. सिंग यांनीही पंजाबच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मान यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com