Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather Update : राज्यात थंड व कोरड्या हवामानाची शक्यता

अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस, तर बंगालच्या उपसागराचे २८.६ अंश सेल्सिअस आणि हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता.२९) आणि उद्या (ता.३०) १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात (Minimum Temperature) अल्पशी वाढ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १ फेब्रुवारी) हवेच्या दाबात अल्पशी वाढ होऊन ते १०१२ ते १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात अल्पशा प्रमाणात घसरण होईल.

शुक्रवारी (ता. ३) हवेचे दाब पुन्हा कमी होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात पुन्हा अल्पशी वाढ होईल.

या आठवड्यात कमाल व किमान कमी-जास्त होण्यामुळे थंडीत वाढ (Cold Weather) अथवा कमी होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्राचे (Arabian Sea) पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस, तर बंगालच्या उपसागराचे २८.६ अंश सेल्सिअस आणि हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अधिक राहण्यामुळे श्रीलंकेजवळ लहान चक्रीय वादळाची (Cyclone) निर्मिती होईल.

हे चक्रीय वादळ मंगळवारी (ता. ३१) तमिळनाडू किनारपट्टीजवळ धडकेल. त्यामुळे त्या भागात पावसाची शक्यता निर्माण होईल.

उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा वेगात वाढ होऊन ते ताशी १५ ते १७ किमी राहील. काही भागांत सोसाट्याचे व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातही वाऱ्याच्या वेगात वाढ होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेय दिशेकडून राहील.

कोकण ः

कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान पालघर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत निरभ्र राहील.

सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळेच कोकणात कमाल व किमान तापमानात घट होईल.

उत्तर महाराष्ट्र ः

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ७१ टक्के, नंदूरबार जिल्ह्यात ६४ टक्के, धुळे जिल्ह्यात ५८ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ४३ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील.

नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.

Weather Update
Weather Forecast : अचुक हवामान अंदाजावर संशोधनासाठी सामंजस्य करार

मराठवाडा ः

कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व लातूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील.

उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात हळूवारपणे वाढ होईल.

किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, बीड व जालना जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील.

उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४१ ते ४६ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ६७ टक्के आणि जालना जिल्ह्यात १५ ते २३ टक्के इतकी कमी राहील.

त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत १५ ते १७ किमी, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १० ते १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २४ टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ ः

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी आणि दिशा आग्येनेकडून राहील.

पूर्व विदर्भ ः

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५१ ते ५८ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४७ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १२ किमी आणि वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

Weather Update
Hawaman Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातपावसाला पोषक हवामान | ॲग्रोवन

पश्‍चिम महाराष्ट्र ः

कमाल तापमान सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस व कोल्हापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील.

सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ६० ते ६६ टक्के आणि उर्वरित जिल्ह्यात ४३ ते ५१ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत आग्येनेकडून, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला ः

१) उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वरंबा व सरीवर करावी.
२) उन्हाळी भेंडीची लागवड करावी.
३) उन्हाळी हंगामात पिकांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
४) टरबूज व खरबूज पिकांच्या लागवडी पूर्ण कराव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com