Bamboo Species : शेतकरी प्रशांत दातेंकडून ९६ प्रजातींचे बांबू संकलन

नाशिक ः जिल्ह्यातील लाखलगाव येथील युवा शेतकरी प्रशांत आत्माराम दाते यांनी पारंपरिक भाजीपाला व द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीचा पर्याय निवडला आहे.
Bamboo farming in Nashik
Bamboo farming in Nashik

Nashik News: जिल्ह्यातील लाखलगाव येथील युवा शेतकरी प्रशांत आत्माराम दाते यांनी पारंपरिक भाजीपाला (Vegetable Cultivation) व द्राक्ष शेतीला (Grape Farming) पर्याय म्हणून बांबू शेतीचा (Bamboo Farming) पर्याय निवडला आहे.

अलीकडेच बांबूंच्या ९६ प्रकारच्या दुर्मीळ प्रजाती (Bamboo Verity) उपलब्ध करून ‘दाते बांबूशेतम’ नावाने त्यांनी बांबू प्रजाती संग्रहालय बनविले आहे.

त्यांच्या संकलन कार्याबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा सन्मान झाला आहे.

Bamboo farming in Nashik
Bamboo Polyhouse : : पॉलिहाउस उभारणीचा खर्च पन्नास टक्क्यांनी करा कमी

दाते यांनी २०१७ मध्ये ‘माणगा’ या बांबू प्रजातीची लागवड केली. या सोबतच प्रयोगशीलतेने काम करत असताना विविध बांबू प्रजातींचे संकलन करण्याचा जणू छंदच लागला. त्यातून अर्ज सादर करतेवेळी भारतात आढळणाऱ्या बांबूंच्या १४८ दुर्मीळ प्रजातींपैकी ९४ जातींचे संवर्धन त्यांनी केले.

पूर्वी द्राक्ष शेती करणाऱ्या शेतात प्रशांत यांनी बदल केले. २०१२ मध्ये माहिती तंत्रज्ञान पदविका पूर्ण केल्यानंतर नोकरी मागे न धावता शेती करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये प्रथम बांबू लागवडीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.

Bamboo farming in Nashik
Bamboo Craft : बांबूमुळे झाली ग्रामीण भागातील शाश्वत रोजगाराची निर्मिती

सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड (ता.दिंडोरी), अमरावती, कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणच्या बांबू रोपवाटिकेस भेट देऊन बांबू शेतीबाबत माहिती घेतली.

२०१७ मध्ये रानबाभळी (ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) येथील स्थानिक शेतकऱ्याकडून बांबूच्या माणगा जातीचे ५०० कंद खरेदी करून त्या प्रजातीची १ एकर लागवड केली होती. त्यानंतर बांबू शेती, बांबू मूल्यवर्धन याबाबत अभ्यास करण्यासह प्रशिक्षणातून त्यांनी सखोल ज्ञान प्राप्त केले.

त्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, बांबूगार्डन वडाळी अमरावती, केरळ वन संशोधन संस्था पिची, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट प्रॉडक्टिव्हिटी (झारखंड), वन संशोधन संस्था (डेहराडून, उत्तराखंड), वन संशोधन संस्था (जोरहाट आसाम), नागालँड बांबू संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ (शिमोगा, कर्नाटक), जवाहरलाल नेहरू उष्णकटिबंधीय वनस्पती उद्यान व संशोधन संस्था (तिरुअनंतपुरम, केरळ) या ठिकाणी जाऊन बांबू शेतीबाबतची माहिती घेतली.

त्यातून बांबूच्या विविध ९४ प्रजातींचे संवर्धन केले. सध्या दाते यांनी विकसित केलेल्या बांबूच्या जातींपैकी माणगा जातीची रोपवाटिका त्यांनी विकसित केली आहे.

शास्त्रीय पद्धतीने बांबू प्रजातींची मांडणी

लाखलगाव येथे बांबू प्रक्रिया उद्योगात टिकवण क्षमता वाढीसाठी प्रकल्पाची उभारणी केली आहे. या सोबत ‘दाते बांबूशेतम’ या बांबू प्रजाती संग्रहालयाचे उद्‍घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते.

त्यांनी आदर्श पद्धतीने शास्त्रीय माहितीसह बांबू प्रजातींची मांडणी केली आहे. आतापर्यंत त्यांच्या बांबू शेतीतील कार्याबद्दल हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांसह देशभरात १८ राज्यांतील शेकडो शेतकऱ्यांना ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात.

वडील आत्माराम, आई सुनीता व भाऊ सागर यांचे त्यांना सातत्याने प्रोत्साहन व पाठबळ लाभले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com