ॲग्रोवनच्या कीड-रोगनियंत्रण विशेषांकाचे सामूहिक वाचन

किनवट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या दुर्गम तांडा वस्तीवर ‘सकाळ-ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झालेल्या खरीप हंगाम कीड-रोग व्यवस्थापण पुरवणीच सामूहिक वाचन करण्यात आले.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

नांदेड : किनवट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या दुर्गम तांडा वस्तीवर ‘सकाळ-ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झालेल्या खरीप हंगाम कीड-रोग व्यवस्थापण पुरवणीच सामूहिक वाचन करण्यात आले. यातील कापूस पीक निरीक्षणात आढळलेल्या किडीचे चित्रे दाखविण्यात आले. पांढरी माशी, तुडतुडे, मावा या शत्रू किडीसोबतच ढाल कीड या मित्रकिडीची माहिती देण्यात आली.

किनवट तालुक्यातील दुर्गम टेंभी रायपूर तांडा येथे कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादन वाढ व मूल्य साखळी योजनेअंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेस तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुन्नेश्‍वर, बालाजी शेणेवाड, तालुका कृषी समन्वयक ईश्‍वर आडे, सरपंच तानबा राठोड उपस्थित होते. शेतीशाळेत तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी कापूस पिकातील मित्र व शत्रू किडीची ओळख आणि संभाव्य गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्राबाबत माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com