Dongri River : डोंगरी नदीच्या संवाद यात्रेस प्रारंभ

शहरातून वाहणाऱ्या डोंगरी नदीच्या संवाद यात्रेचा प्रारंभ नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्या हस्ते हातात पाण्याचा कलश व तिरंगा ध्वज घेऊन नुकताच करण्यात आला.
Dongri River
Dongri RiverAgrowon

चाळीसगाव, जि. जळगाव : शहरातून वाहणाऱ्या डोंगरी नदीच्या संवाद यात्रेचा प्रारंभ नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे (Jitendra Dhanrale) यांच्या हस्ते हातात पाण्याचा कलश व तिरंगा ध्वज घेऊन नुकताच करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व डॉ. अब्दुल कलाम (Dr. Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त मिशन पाचशे कोटी लिटर टीमतर्फे अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, नदी संवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. सातमाळा डोंगररांगातून पाटणा देवी अभयारण्यामधून उगम पावणारी डोंगरी नदीच्या संवाद यात्रेला मिशन- पाचशे लिटर अभियानाच्या पाचपाटील टीमने सुरुवात केली आहे.

Dongri River
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्या हस्ते हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या दर्गाजवळील डोंगरी नदीतून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मिशनचे सर्वेसर्वा डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत ठोंबरे (नगरपालिका, चाळीसगाव), वन अधिकारी शीतल नगराळे, इनरव्हील क्लबच्या महिला व पाचपाटील टीम उपस्थित होते.

या वेळी नायब तहसीलदारांनी संवाद यात्रेत प्रशासनातर्फे व्यवस्थापनाच्या विविध विभागांची माहिती देऊन नकाशे डाटाबेस उपलब्ध करत अभियान यशस्वी करू, असे सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी शहर हद्दीतील डोंगरी/तितूर नदी स्वच्छता अभियानाचा सकारात्मक फायदा व सर्वांनी केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले.

दरम्यान, डोंगरी तितूर नदीच्या सहा किलोमीटर पात्राची जबाबदारी वन अधिकारी शीतल नगराळे यांनी घेतली. तसेच नदीकाठाची खोरे गावांसह परिसरांना वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून जमिनीची धूप थांबविण्याचा प्रयत्न करूया, असे सांगितले. या वेळी टीमच्या वतीने समन्वयक शेखर निंबाळकर यांनी या यात्रेची ध्येयधोरण सांगून लोकसहभागातून व कृतीतून डोंगरी नदी अमृत वाहिनी कशी करता येईल, याचे नियोजन करूया, असे आवाहन केले.

चला नदीला जाणूया अभियान

नदी व समन्वयक : डोंगरी नदी : शेखर निंबाळकर/सविता राजपूत, तितूर नदी : प्रशांत गायकवाड, दिनेश जाधव. भराडी नदी - एकनाथ माळतकर, मिलिंद देवकर. बेलगंगा नदी : प्रा. आर. एम. पाटील, प्रा. किमू पाटील यांच्यासह मिशनच्या पाचपाटील टीम सोबत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com